ETV Bharat / city

मुंबईत सार्वजनिक, घरगुती गणपतीचे आगमन; सर्वत्र उत्साहाचे वातावरण - आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण

शहरात ठिक-ठिकाणी गणपतीच्या आगमनाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मुंबईतील काही गणेश मंडळांनी आज वाजत गाजत गणपती बाप्पांची मिरवणूक काढली. एकदंरीत शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

मुंबईत सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचे आगमन
author img

By

Published : Sep 1, 2019, 8:45 PM IST

मुंबई - शहरात आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आज गणेश चतुर्थीच्या एक दिवस अगोदर आगमन होत आहे. दरम्यान, आज मुंबईतील काही मंडळांच्या आणि काही भागातील घरांमध्ये आज गणपतीची प्रतिष्ठापना होत आहे.

हेही वाचा - अष्टविनायकातील एक ओझरच्या विघ्नहराच्या 'द्वारयात्रे'ची समाप्ती; उद्या होणार गणेशजन्मोत्सव सोहळा

शहरात ठिक-ठिकाणी गणपतीच्या आगमनाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. मुंबईतील काही गणेश मंडळांनी आज वाजत गाजत गणपती बाप्पांची मिरवणूक काढली. एकदंरीत शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गुलालाची उधळण, पथकांचा आवाज आणि गणपत्ती बाप्पा मोरया... असा जयघोष पाहून गणेशभक्तांसह उपस्थितांचा उत्साह द्विगुणीत झाल्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा - लालबागच्या राजाला चांद्रयान २ चा देखावा, नितीन देसाई यांची कलाकृती

मुंबईतील खेतवाडी गणपती मंडळ, श्री तजी एस. बी. गणपती मंडळ, धारावीतील विघ्नहर्ता मंडळ, लालबाग, काळाचौकी व शिवडी भागातील गणेशोत्सव या मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे. तसेच उद्या गणेश चतुर्थी असल्याने गणरायाच्या पुजेसाठी, सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी लोकांची दिवसभर सर्वत्र गर्दी पाहण्यात आली. विशेषत: दिव्यांच्या माळा, थर्माकॉलची मखर, तोरणे तसेच अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी बाजारात गर्दी केली आहे.

Intro:मुंबईतील अनेक गणपतीचं आज आगमन

मुंबईमध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पाचं वाजतगाजत आज गणेश चतुर्थी अगोदर एक दिवस बाप्पाचं आगमन होत आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज,मुंबईतील काही मंडळांचे आणि काही भागातील कौटुंबिक घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना होत आहेत.

आज गणपती अगमनाला ठीक ठिकाणी तर ढोल ताशांचा गजरही लावण्यात आला आहे. मुंबईतील काही गणेश मंडळांनी आज वाजत गाजत गणपती बाप्पांची मिरवणूक काढली आहे. गुलालाची उधळण, जहाँज पथकांचा आवाज आणि गणपत्ती बाप्पा मोरया... असा जयघोष पाहून गणेशभक्तांसह उपस्थितांचाही उत्साहण द्विगुणीत झाल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईतील खेतवाडी गणपती मंडळ, श्री तजी एस बी गणपती मंडळ, धारावीतील विघ्नहर्ता मंडळ, लालबाग ,काळाचौकी व शिवडी भागातील गणेशोत्सव या मानाच्या ही गणपतींची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे. तसेच आज फक्त शेवटचा दिवस दिवस राहिल्याने मुहूर्तावर गणरायाच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीसाठी लोकांची दिवसभर सर्वत्र गर्दी आहे.विशेषत: दिव्यांच्या माळा, थर्माकॉलची मखर, तोरणे, तसेच अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी बाजारात केली आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.