ETV Bharat / city

पुढच्या वर्षापासून ब्रेल लिपीतही पुस्तके: शिक्षणमंत्री आशिष शेलार यांची घोषणा - Braille script

नाशिक येथील दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन(इंडिया) या संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील गाईड तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन आज वांद्रे येथील कार्यक्रमात शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना शेलार यांनी अन्य भाषांप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीतही पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

आशिष शेलार
author img

By

Published : Sep 10, 2019, 6:42 PM IST

Updated : Sep 10, 2019, 7:01 PM IST

मुंबई- बालभारतीतर्फे अन्य भाषांप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. तशी घोषणा आज(मंगळवारी) शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी वांद्रे येथील कार्यक्रमात केली.

प्रतिक्रिया देताना शिक्षणमंत्री
नाशिक येथील दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन(इंडिया) या संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील गाईड तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन आज वांद्रे येथील कार्यक्रमात शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर, ज्या कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर फंडातून या गाईडचे प्रकाशन करण्यात आले आहे त्या बँकेचे संचालक स्वामीनाथन यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेसाठी एक ब्रेल प्रिंटर मिळावा अशी मागणी केली. तीही मान्य करून शेलार यांनी हा प्रिंटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच राज्यात अन्य भाषेतील आणि लिपीतील पाठ्यपुस्तके बालभारतीतर्फे प्रकाशित केली जातात. त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तकेही बालभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात येतील. त्याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या बालभारतीच्या बोर्डाच्या मिटिंगमध्येही घेण्यात आला आहे व त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे. असे सांगत पुढील शैक्षणिक वर्षापासून अंध विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्यपुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध होतील अशी घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केली.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी 'ईटीवी भारतशी बोलताना सांगितले की आम्ही राज्यातील ४० अंध विद्यार्थ्यांच्या शाळांना ब्रेल लिपीत काढण्यात आलेली ही पुस्तके आणि त्यांचा संच मोफत वितरीत करणार आहोत. एका संचाची किंमत साधारणपणे सहा हजार चारशे रुपये इतकी असली तरी ती आम्ही या विद्यार्थ्यांना मोफत देणार असल्याचेही अरुण भारस्कर म्हणाले. संस्थेच्या मानद अध्यक्ष कल्पना पांडे यांनी सांगितले की आमच्या आजच्या प्रयोगामुळे राज्यभरातील सुमारे बाराशे अंध विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा फायदा होणार असून त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेतही सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

Intro:बालभारतीतर्फे पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही पुस्तके : शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

mh-mum-edu-mini-shelar-brellipi-byte-7201153

mh-mum--brellipi-klpana-arun-byte-7201153 (mojo वरून पाठवले आहे)

mh-mum--brellipi-vhij-7201153
mojo वरून पाठवले आहे)

मुंबई, ता. १० :
बालभारतीतर्फे अन्य भाषांप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीत पाठ्यपुस्तके प्रकाशित करण्यात येतील अशी घोषणा शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी आज वांद्रे येथील कार्यक्रमात केली.
नाशिक येथील दि ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन (इंडिया) या संस्थेतर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील गाईड तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशन आज वांद्रे येथील कार्यक्रमात शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर ज्या कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर फंडातून या गाईडचे प्रकाशन करण्यात आले आहे त्या बँकेचे संचालक स्वामीनाथन यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी संस्थेसाठी एक ब्रेल प्रिंटर मिळावा अशी मागणी केली तीही मान्य करून मंत्री अशिष शेलार यांनी हा प्रिंटर उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच राज्यात अन्य भाषेतील आणि लिपीतील पाठ्यपुस्तके बालभारतीतर्फे प्रकाशित केली जातात त्याचप्रमाणे पुढील वर्षापासून ब्रेल लिपीतील पाठ्यपुस्तके ही बालभारतीतर्फे उपलब्ध करून देण्यात येतील, त्याबाबतचा निर्णय नुकताच झालेल्या बालभारतीच्या बोर्डाच्या मिटिंग मध्ये घेण्यात आला आहे व त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे,असे सांगत पुढील शैक्षणिक वर्षापासून अंध विद्यार्थ्यांना त्यांची पाठ्य पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध होतील अशी घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केली.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी 'ईटीवी भारतशी बोलताना सांगितले की आम्ही राज्यातील ४० अंध विद्यार्थ्यांच्या शाळांना ब्रेल लिपीत काढण्यात आलेली ही पुस्तके आणि त्यांचा संच मोफत वितरीत करणार आहोत एका संचाची किंमत साधारणपणे सहा हजार चारशे रुपये इतकी असली तरी ती आम्ही या विद्यार्थ्यांना मोफत देणार असल्याचेही अरुण भारस्कर म्हणाले. संस्थेच्या मानद अध्यक्ष कल्पना पांडे यांनी सांगितले की आमच्या आजच्या या प्रयोगामुळे राज्यभरातील सुमारे बाराशे अंध विद्यार्थ्यांना या पुस्तकांचा फायदा होणार असून त्यामुळे त्यांच्या गुणवत्तेत ही सुधारणा होईल अशी आम्हाला अपेक्षा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.Body:बालभारतीतर्फे पुढच्या वर्षीपासून ब्रेल लिपीतही पुस्तके : शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
Conclusion:
Last Updated : Sep 10, 2019, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.