ETV Bharat / city

31 डिसेंबरपासून मुंबईकरांचा सी लिंक ते बीकेसी-कुर्ला प्रवास सुपरफास्ट - मुंबई सी लिंक ते धारावी सुपरफास्ट प्रवास बातमी

2017 मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी सुमारे 103.73 कोटी खर्च अपेक्षित आहे. बीकेसी ते सी लिंक आणि सी लिंक ते बीकेसी हे दोन उन्नत रोड 714.40 मीटर लांब आणि 7.50 मीटर रुंद असा हा उन्नत रोड आहे. तर धारावी ते सी लिंक हा उन्नत रोड 310.10 मीटर लांब आणि 7.50 मीटर रुंद आहे. या तिन्ही रोडचे काम 2 जानेवारी 2017 पासून सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे होते. आता 29 जानेवारी 2020 मध्ये मे. आरपीएफ या उपकंत्राटदाराची नेणमूक करत कामाला वेग देण्यात आला आहे.

from december 31 mumbaikars will travel from sea link to bkc kurla superfast
31 डिसेंबरपासून मुंबईकरांचा सी लिंक ते बीकेसी-कुर्ला प्रवास सुपरफास्ट
author img

By

Published : Oct 12, 2020, 5:26 PM IST

मुंबई - आंतरराष्ट्रीय स्तरावर वांद्रे-कुर्ला संकुलाचा विकास करताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यात येत आहे. त्यासाठीच कलानगर उन्नत रोड प्रकल्प हाती घेण्यात आला असून आता या प्रकल्पाचे काम 73 टक्के पूर्ण झाले आहे. तर लवकरच प्रकल्पाचे 100 टक्के काम पूर्ण करत 31 डिसेंबर 2020 ला हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील अडीच महिन्यांत सी लिंक ते बीकेसी-कलानगर आणि सी लिंक ते धारावी प्रवास सुपरफास्ट होणार आहे.

सी लिंकवरून बीकेसी, कुर्ल्याकडे आणि धारावीकडे जाताना कलानगर जंक्शनवर ब्रेक लागतो. येथे सिग्नल लागते तर सिग्नल पार केल्यानंतर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता एमएमआरडीएने कलानगर उन्नत रोड प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत सी लिंक ते धारावी, सी लिंक ते बीकेसी आणि बीकेसी ते सी लिंक असे तीन उन्नत रोड बांधण्यात येत आहे. 2017 मध्ये या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून यासाठी सुमारे 103.73 कोटी खर्च अपेक्षित आहे. बीकेसी ते सी लिंक आणि सी लिंक ते बीकेसी हे दोन उन्नत रोड 714.40 मीटर लांब आणि 7.50 मीटर रुंद असा हा उन्नत रोड आहे. तर धारावी ते सी लिंक हा उन्नत रोड 310.10 मीटर लांब आणि 7.50 मीटर रुंद आहे. या तिन्ही रोडचे काम 2 जानेवारी 2017 पासून सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे होते. आता 29 जानेवारी 2020 मध्ये मे. आरपीएफ या उपकंत्राटदाराची नेणमूक करत कामाला वेग देण्यात आला आहे.

अगदी कोरोनाच्या काळात ही प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. आजच्या घडीला 81788 कुशल तर 245365 अकुशल कामगार या प्रकल्पावर काम करत आहेत. त्यामुळेच आतापर्यंत या प्रकल्पाचे 73 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती आर ए राजीव, महानगर आयुक्त यांनी दिली आहे. तर पुढील अडीच महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण करत 31 डिसेंबर 2020 ला हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही राजीव यांनी सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकल्प सुरू झाला तर सी लिंक ते बीकेसी-कुर्ला आणि धारावी तसेच बीकेसी ते सी लिंक असा प्रवास सुपरफास्ट आणि सिग्नल विरहित होणार आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल रात्री या प्रकल्पाची पाहणी केली. कामाचा आढावा घेतला. तर कामाच्या सद्यस्थितीवर समाधान व्यक्त केल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.