मुंबई मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोबाईल सोन्या- चांदीच्या वस्तू पाकीट मारी आणि मौल्यवान वस्तू कायम करतात. त्याच प्रकारे यंदा देखील जवळपास 50 हून अधिक तक्रारी काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. Women Arrested From Pune त्याप्रकरणी पोलिसांनी याआधी दोन झारखंडच्या पुरुषांना अटक केली होती. Mumbai Crime त्यानंतर आता पुण्याहून आंध्र प्रदेशच्या चार महिलांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस उपनिरीक्षकांची माहिती काळाचौकी पोलिसांनी चार महिलांना पुण्यातून बेडा ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 16 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या चारही महिला 30 ते 35 वयोगटातील असल्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली. चव्हाण यांनी पुढे सांगितले की, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देखील बरीच गर्दी होते.
काळाचौकी पोलीस ठाण्यात दाखल या गर्दीचा फायदा घेऊन दरोडा टाकण्याच्या उद्देशाने देखील दोन इसम या महिलांसोबत वावरत असल्याचे दिसून आल्याने पुणे शाखेने यांना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, काळाचौकी पोलीस ठाण्यात Kalachowki Police Station दाखल झालेल्या दोन गुणांची उकल करत चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, दोन इतर पुरुषांबाबत कोणताही पुरावा नसल्याने त्यांना ताब्यात घेता आले नाही.
भाविकांची मोठी गर्दी ९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी होती. गेली दोन वर्षे कोरोना संकटामुळे सर्व सणांवर निर्बंध होते. यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने मोठ्या उत्साहात तसेच कुठल्याही निर्बंधाशिवाय गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. दोन वर्षानंतर लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. तसेच अननंत चतुर्दशीच्यावेळी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक हजर होते. या गर्दीत काही चोरटेही शिरले होते. या चोरांनी गर्दीतून लोकांचे मोबाईल आणि पाकिटं लंपास केली होती.