ETV Bharat / city

Omicron In Mumbai : मुंबईत ओमायक्रॉन विषाणूचे ४ नवे रुग्ण, रुग्णांचा आकडा १९ वर - ओमिक्रॉन महाराष्ट्रात

मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे ( Omicron Patient In Mumbai ) रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले ४ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या (Mumbai Omicron Patient Numbers) १९ झाली आहे. त्यापैकी १३ रुग्ण बरे झाल्याने ( Mumbai Omicron Patient Discharge ) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Omicron Patient In Mumbai
Omicron Patient In Mumbai
author img

By

Published : Dec 18, 2021, 9:09 PM IST

Updated : Dec 21, 2021, 5:26 PM IST

मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनचे ( Omicron Patient In Mumbai ) रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेश प्रवास केलेले ४ प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या (Mumbai Omicron Patient Numbers) १९ झाली आहे. त्यापैकी १३ रुग्ण बरे झाल्याने ( Mumbai Omicron Patient Discharge ) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • रुग्णांचा आकडा १९ वर -

मुंबई विमानतळावर अति जोखमीच्या देशातून ९१०० प्रवासी आले. त्यापैकी २५ प्रवासी विमानतळावरच्या चाचणीत कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. १ नोव्हेंबरपासून परदेश प्रवास केलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण केले जात आहे. त्यात ५० प्रवासी कोरोना पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांच्या अतिजोखमीचे सहवासातील १५ रुग्ण पॉजिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना पॉजिटीव्ह प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही, पुणे) येथे जीनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पाठविण्यात आले. त्यात आतापर्यंत १९ जणांना ओमायक्रॉन कोविड विषाणू प्रकाराची बाधा झाल्याचा अहवाल महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

  • हे चार रुग्ण ओमायक्रॉन पॉजिटिव्ह -

३२ वर्षीय केरळचा रहिवासी पुरुष साऊथ आफ्रिका येथून ६ डिसेंबरला रोजी मुंबईला आला. ११ डिसेंबरला तो कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला. जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत तो ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आला. त्याने फायझर लसीचा एक डोस घेतला होता. ३१ वर्षीय जळगावचा रहिवासी पुरुष साऊथ आफ्रिका येथून ६ डिसेंबरला रोजी मुंबईला आला. ११ डिसेंबरला तो कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला. जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत तो ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आला. त्याने कोविशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले होते. ४८ वर्षीय छत्तीसगढचा रहिवासी पुरुष टांझानिया येथून ११ डिसेंबरला मुंबईला आला. ११ डिसेंबरला तो कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला. जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत तो ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आला. त्याने कोणत्याही लसीचे डोस घेतले नव्हते. ४९ वर्षीय युनाइटेड किंग्डमचा रहिवासी पुरुष लंडन येथून १२ डिसेंबरला मुंबईत आला. १२ डिसेंबरला तो कोरोना पॉजिटीव्ह आढळून आला. जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीत तो ओमायक्रॉन पॉजिटीव्ह आढळून आला. त्याने एसट्राझेनेका लसीचे दोन्ही डोस घेतले होते. एकही रुग्ण गंभीर स्थितीत नाही. ओमायक्रॉन बाधित रुग्णांपैकी १३ रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास अवगत करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

  • रुग्णांची संख्या २०० पार

गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर दोन वर्षांत कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. या दोन्ही लाटांवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे. मुंबईत पहिली लाट यावर्षी मार्चमध्ये आणि दुसरी लाट फेब्रुवारीनंतर आली. एप्रिलमधील दुसऱ्या लाटेत ( Covid Second Wave Mumbai ) दररोज 11 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत होते. मात्र, त्याानंतर पुन्हा एकदा जूनपासून रुग्णांच्या संख्येत घट झाली. 1 डिसेंबर रोजी सर्वात कमी 108 रुग्ण आढळले होते. मात्र त्यानंतर पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या 200 पार गेली आहे. तसेच 15 डिसेंबरला 238, डिसेंबर 16 रोजी 279 आणि 17 डिसेंबरला 295 रुग्णांची नोंद करण्यात आली.

  • 16 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

नवी मुंबईतील घणसोली येथील कृषी महाविद्यालयात तब्बल 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन दिवसांत 16 विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह ( Covid Report Positive ) आल्याने नवी मुंबई महापालिकेच्या ( Navi Mumbai Municipal Corporation ) माध्यमातून विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. सोळा विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून शुक्रवारी 375 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. तसेच शनिवारी 600 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्राप्त झाली आहे.

  • ओमायक्रॉनच्या मुंबईमधील केसेस

मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना, ओमायक्रॉना असलेले रुग्ण आढळून येत आहेत. आज मुंबईत परदेशातून प्रवास करुन आलेल्या 4 प्रवाशांची मुंबईत विमानतळावर ओमायक्रॉनची चाचणी ( Mumbai Airport Omicron Test ) पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मुंबईतील ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन, ती संख्या आता 19 झाली आहे. त्यापैकी 13 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहेत.

  • ओमायक्रॉनचा साताऱ्यात शिरकाव

दक्षिण आफ्रिकेतील युगांडातून फलटण येथे आलेल्या चौघांपैकी तिघांची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटिव्ह आली ( Omicron In Satara ) आहे. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील चौथ्या व्यक्तीला सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या इमारतीत जितकी कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यातील प्रत्येक नागरिकांची टेस्ट केली जाणार आहे. तसेच संबंधित रुग्णांवर फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - Zero Covid Patient deaths - मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या शून्य मृत्यूंची नोंद, नवीन 283 रुग्णांची नोंद

Last Updated : Dec 21, 2021, 5:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.