ETV Bharat / city

मुंबईत कोरोना नियम मोडल्याने मागीतली दीड लाखांची खंडणी, चौघांना अटक

author img

By

Published : May 16, 2021, 9:16 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने क्लीन-अप मार्शलची नेमणूक मुंबईच्या प्रभागांमध्ये करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरुपात पैशांचे मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

चौघांना अटक
चौघांना अटक

मुंबई - महाराष्ट्रासह मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. नागरिक नियमांचे पालन करत नसल्यामुळे सरकारच्या वतीने लॉकडाऊन लावण्यात आलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने क्लीन-अप मार्शलची नेमणूक मुंबईच्या प्रभागांमध्ये करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या स्वरुपात पैशांचे मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

मुंबईत कोरोना नियम मोडल्याने मागीतली दीड लाखांची खंडणी, चौघांना अटक

अरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

अंधेरी परिसरातील एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये अशाच एका मालकाकडून या क्लीन-अप मार्शलने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या सर्व प्रकारच्या माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली व त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, दादासाहेब गोडसे, आकाश गायकवाड या चार आरोपींना अटक केली आहे. तर यातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच त्यांनी आणखी कोणत्या ठिकाणी अशाप्रकारे लूट केली आहे का? याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे, असे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

हेही वाचा - वादळाचा तडाखा! जळगावात झोपडीवर झाड कोसळून 2 बहिणींचा मृत्यू

हेही वाचा - Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात तौत्के चक्रीवादळाचे थैमान, महामार्गावरील अपघातात एकाच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.