ETV Bharat / city

सकारात्मक! नायरमधील 40 बाळंतीण मातांची कॊरोनावर मात - Forty mothers beat covid- 19

मुंबईच्या नायर रुग्णालयात आतापर्यंत कॊरोनाबाधित 106 गर्भवतीचे सुखरूप बाळंतपण करण्यात आले आहे. 109 बाळांनी जन्म घेतला असून यातील 100 बाळांचा कॊरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर यातील 106 पैकी 40 बाळंतिणींनी कॊरोनावर मात केली असून या माता-बाळांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

mothers in Nair Hospitals beat covid- 19
40 बाळंतीण मातांची कॊरोनावर मात
author img

By

Published : May 19, 2020, 8:13 PM IST

मुंबई:- कोरोनाच्या नकारात्मक बातम्या सतत कानावर पडत असताना एक सकारात्मक बातमी आहे. मुंबई महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयात आतापर्यंत कॊरोनाबाधित 106 गर्भवतींचे सुखरूप बाळंतपण करण्यात आले आहे. 109 बाळांनी जन्म घेतला असून यातील 100 बाळांचा कॊरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर यातील 106 पैकी 40 बाळंतिणींनी कॊरोनावर मात केली असून या माता-बाळांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गर्भवतींना कॊरोनाची लागण होण्याची आणि त्यामुळे त्यांच्या बाळंतपणात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता नायर रुग्णालयात कॊरोनाबाधित गर्भवतींसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला होता. या कक्षात आज दुपारपर्यंत कॊरोनाबाधित 106 गर्भवतींचे सुखरूप बाळंतपण करण्यात आल्याची माहिती डॉ. सुषमा मलिक, प्रमुख, बालरोग विभाग यांनी दिली आहे.

106 पैकी एका मातेने तिळ्यांना तर एका मातेने जुळ्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे नायर मध्ये एकूण 109 बाळं जन्माला आली आहेत. ही सर्व बाळं ठणठणीत असून यातील 100 बाळांचा कॊरोना अहवाल निगेटिव्ह आला, हे विशेष. यामुळे माताच नव्हे तर डॉक्टर-नर्स सर्व कर्मचारीवर्ग खूश असल्याचेही डॉ. मलिक यांनी सांगितले. दरम्यान बाकीच्या बाळांचा अहवाल प्रलंबित असून तो लवकरच प्राप्त होईल. तर आतापर्यंत 40 मातांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानुसार या 40 मातांना आणि 43 बाळांना (जुळी-तिळी मिळून) डिस्चार्ज देण्यात आला आला आहे. आता 66 बाळं कक्षात असून ते आईजवळच असतात. सर्व काळजी घेत एक-दोन बाळ वगळता इतर बाळांना आईजवळ दिले जाते, स्तनपानही केले जाते, असेही त्या म्हणाल्या. माता कॊरोनावर मात करत असल्याने ही खूप दिलासादायक आणि सकारात्मक बाब ठरत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.