ETV Bharat / city

9380 crore scam : मुंबईतील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात आलेल्या घरात 9380 कोटींचा घोटाळा : रवी राजा यांचा आरोप

author img

By

Published : May 21, 2022, 10:27 AM IST

मुंबईतील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांत 9380 कोटींचा घोटाळा झाला आहे. असा आरोप ( 9380 crore scam allegations ) मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केलेल्या आरोपाचे पालिका प्रशासनाकडून खंडन करण्यात आले आहे. ( Rebuttal from municipal administration )

BMC
मुंबई महापालिका

मुंबई : मुंबईमधील प्रकल्पबाधितांसाठी बांधण्यात येणाऱ्या घरांत ( Mumbai House Scam ) ९३८० कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप मुंबई मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा ( Ravi Raja ) यांनी केला आहे. यावर राज्य सरकारची मंजुरी घेण्यात आली असून, तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली आहे. यामुळे या प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. ( Disclosure that there was no irregularity by the municipal administration )

पालिका म्हणते अनियमितता नाही : प्रकल्पग्रस्तांना पालिकेकडून घरे दिली जातात. घरे कमी असल्याने पालिकेने घराची किंमत देण्याचे धोरण आखले. मात्र, सर्वांना घराची किंमत दिल्यास त्याचा पालिकेवर आर्थिक बोजा पडणार होता. त्यातच २०१५ ते २०२१ या सात वर्षांत म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए आदी यंत्रणांनी पालिकेला २११३ घरे उपलब्ध करून दिली आहेत. पालिकेला येत्या ३ वर्षांत ३६ हजार २२९ घरांची आवश्यकता भासणार आहे. पालिकेने राज्याच्या नगर विकास विभागाकडून परवानगी घेऊन खासगी भूखंडावर विकासकांना बांधकाम टीडीआर, भूखंड टीडीआर आणि क्रेडिट नोट देऊन घरे उपलब्ध करून घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्याआधी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. यामुळे या प्रकियेत अनियमितता झाली नसल्याचा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

काय आहे रवी राजा यांचा आरोप : मुलुंड, भांडुप, वरळी आदी ठिकाणी १४ हजार घरे बांधली जाणार होती. या प्रकल्पाची रेडी रेकनरनुसार मूळ किंमत ३२०० कोटी होती. परंतु, पालिकेने विकासकांना प्रीमिअम क्रेडिट नोट, भूखंड टीडीआर, कन्स्ट्रक्शन टीडीआरमधून बिल्डरला ९३८० हजार कोटींचा फायदा करून देण्यात आला. हा पालिकेतील सर्वात मोठा भूखंड टीडीआर घोटाळा आहे. मुंबईकरांच्या पैशांची ही उधळपट्टी असल्याने या प्रकरणी काँग्रेसने लोकायुक्तांना, पालिका आयुक्तांना आणि सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनला पत्र दिले आहे. या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी दिला आहे.

हेही वाचा : प्रकल्पग्रस्तांना सदनिकांऐवजी ५० लाखांचा मोबदला; पालिकेकडून धोरणाला मंजुरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.