मुंबई - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेतील 'इनकमींग' चालूच आहे. नुकतेच काँग्रेसचे माजी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
सिल्लोडमधून पुन्हा निवडून येण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सत्तारांना देऊन मराठवाड्यात शिवसेनेसाठी कार्यरत राहण्याचा प्रभार सोपवला. तसेच सत्तारांनी काल मला मराठवाड्याची जबाबदारी सांभाळण्यासंबंधी शब्द दिला असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन विघ्नहर्ता गणेशाला देशावर येणारे विघ्न दूर करण्याची प्रार्थना केली. तसेच छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन बोलणे टाळले.
सगळ्यांना विचारुन शिवसेनेत प्रवेश करतोय, असे अब्दुल सत्तार म्हणाले. तसेच यंदाच्या विधानसभेला सिल्लोडमधून ऐतिहासीक लीड मिळवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. सेनाप्रमुखांनी सोपवलेली जबाबदारी उत्तम पार पडेन, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा औरंगाबाद जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तारांनी पक्ष सोडताच काँग्रेस भवनला दिलेल्या ३०० खुर्च्या नेल्या परत
निवडून आल्यानंतर सर्वप्रथम उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेऊन सभागृहात प्रवेश करीन असे, वक्तव्य सत्तार यांनी केले.