ETV Bharat / city

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या सर्व बैठका रद्द, हे आहे कारण

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून सतत विविध दौरे आणि सभा, कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. रात्री उशिरापर्यंत जागून ते काम करत आहेत. यामुळे त्यांना खूपच शारीरिक थकवा आला असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

CM Eknath Shinde
CM Eknath Shinde
author img

By

Published : Aug 4, 2022, 2:22 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध दौरे आणि सभा, कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. रात्री उशिरापर्यंत जागून ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांना खूपच शारीरिक थकवा आला असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात पुणे- नाशिक आणि औरंगाबाद येथे विभागीय बैठका घेतल्या आहेत. तसेच काही मतदारसंघांमध्ये सभा आणि मेळावे सुद्धा घेतले. तसेच विविध विकास कामांचे उद्घाटनही त्यांनी सपाट्याने केले आहे. मुंबईतही अनेक बैठका आणि कार्यक्रमांना त्यांनी सातत्याने उपस्थिती लावली. या दरम्यान रात्री उशिरापर्यंत काम केल्याने त्यांना आता शारीरिक थकवा आला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवसाची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

सर्व प्रशासकीय बैठका रद्द - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. मंत्रालयात विविध विकास कामांचा आढावा आणि अन्य बैठका घेण्यात येणार होते. मात्र, त्यांनी या बैठका रद्द करीत असल्याचे जाहीर केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी लावली गणेशोत्सव मंडळाच्या बैठक हजेरी - गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी आदी आगामी सण, उत्सव शांततेत, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश मंडळांना केले. उत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही यावेळी मुख्यमंत्र्यांनी ( CM Eknath Shinde attended meeting of Ganeshotsav Mandal ) दिले.

सण उत्सव धुमधडाक्यात साजरे - पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला १२५ हून अधिक वर्षांची परंपरा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती हे उत्सव समाजजागृतीच्या उद्देशाने सुरू केले. ही परंपरा मंडळांनी सुरू ठेवावी. गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दही हंडी आदी सण उत्सव धुमधडाक्यात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेश मंडळांना बैठकीत म्हटल आहे.

हेही वाचा - Sanjay Raut ED Custody : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion : 5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; वाचा भाजप-शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.