मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देत असल्याची नाहक ओरड करू नका. असे काहीही होत नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन ( FM Nirmala Sitharaman ) यांनी विरोधकांना सुनावले आहे. एकत्र यायचे असेल तर नक्की या. पण खोटे आरोप करू नका, असेही त्या मुंबईत पत्रकार परिषदेत म्हणाल्या आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की आम्ही उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यासोबत ( meeting with industrialist and bankers ) चर्चा केली आहे. आर्थिक बाजारपेठ म्युच्युअल फंडसह अन्य बाबींवर चर्चा केली आहे. सर्व बँका खाजगी आणि सहकारी, सरकारी बँकासोबत अर्थ विभागातील सचिवांसोबत चर्चा केली. एलआयसीचा आयपीओसुद्धा ( Nirmala Sitharaman on LIC IPO ) येणार आहे. एलआयसीबाबत जर चांगले होणार असेल तर अन्य क्षेत्राबाबत तसेच आहे.
-
On being asked about the Chinese apps ban, Finance Minister Nirmala Sitharaman said, "apps get banned because they are found being deleterious in one way or another. We have banned apps earlier also, like in 2020. Trades continue on the requirement of importers." pic.twitter.com/DET3gJ0pPz
— ANI (@ANI) February 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">On being asked about the Chinese apps ban, Finance Minister Nirmala Sitharaman said, "apps get banned because they are found being deleterious in one way or another. We have banned apps earlier also, like in 2020. Trades continue on the requirement of importers." pic.twitter.com/DET3gJ0pPz
— ANI (@ANI) February 22, 2022On being asked about the Chinese apps ban, Finance Minister Nirmala Sitharaman said, "apps get banned because they are found being deleterious in one way or another. We have banned apps earlier also, like in 2020. Trades continue on the requirement of importers." pic.twitter.com/DET3gJ0pPz
— ANI (@ANI) February 22, 2022
अर्थसंकल्पानंतर मुंबईतील उद्योजक व्यावसायिक आणि बँकर्स यांच्यासोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन दिवसीय चर्चासत्र घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, की केंद्रीय तपास यंत्रणा मनात आणूनही कोणाच्या विरोधात विनाकारण आकस बुद्धीने काम करू शकत नाहीत. काहीतरी चुकीचे घडल्याशिवाय यंत्रणा तपास कशाचा करतील? जिथे काही चुकीचे असेल तिथे यंत्रणा नक्की जातील, असेही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मुंबईत स्पष्ट केले.
हेही वाचा-Third front : राऊत म्हणतात आमच्या शिवाय शक्य नाही, काॅंग्रेसने अहंकार बाजुला ठेवावा जाणकारांचे मत
केंद्रीय तपास यंत्रणेच्या नावाने खडे फोडू नका
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मुंबईत येऊन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. तिघांना एकत्र यायचे असेल तर त्याला कोणाचीही हरकत नाही. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहेत. मात्र, त्यासाठी विनाकारण केंद्रीय तपास यंत्रणेच्या नावाने खडे फोडू नका, असेही त्या यावेळी ( FM Sitharaman on ED probe ) म्हणाल्या.
हेही वाचा-MH Government Employees Strike : राज्य सरकारचे कर्मचारी उद्यापासून संपावर; 'या' आहेत मागण्या
बंगालमध्ये काय चाललंय?
तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये नक्की काय चालले याचाही अंदाज घ्या. तेथील राज्य सरकारच्या पोलिसांमार्फत कशा पद्धतीची अरेरावी सुरू आहे, याबाबतही चर्चा करा असेही सीतारामन यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा-MSRTC Merger Petition Hearing : एसटी विलीनीकरण याचिकेवर शुक्रवारी पुढील सुनावणी
अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत चर्चा
मुंबईत २१ आणि २२ फेब्रुवारी या दोन दिवशी मुंबईतील उद्योजक व्यावसायिक आणि बँक यांच्यासोबत अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत पश्चात चर्चा करण्यात आली. या चर्चेत विशेष असे काही बाब नसली तरी कोणत्या गोष्टींवर भर दिला आहे आणि कोणत्या गोष्टींवर नाही याबाबत स्पष्टता करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आयआरडीएच्या अध्यक्षपदी लवकरच नेमणूक ( FM on IRDA president Appointment )
आयआरडीएचे अध्यक्ष पद गेल्या दहा महिन्यांपासून रिक्त आहे. यामुळे विमा क्षेत्रातील अनेक समस्या प्रलंबित असल्याबाबत सीतारामन यांचे लक्ष वेधण्यात आले. या संदर्भात बोलताना सीतारामन म्हणाल्या, की लवकरच योग्य व्यक्तीची अध्यक्षपदी नेमणूक करण्यात येईल. तसेच एलआयसीच्या आयपीओबाबत बाजारात उत्सुकता आहे. जर काही चांगले होत असेल तर त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा, असेही सीतारामन यावेळी म्हणाल्या.
युक्रेन आणि रशियामधील परिस्थितीवर सरकारचे लक्ष
युक्रेन आणि रशियामधील परिस्थिती तणावाची आहे. त्यामुळे शेअर बाजारामध्ये त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. मात्र अद्यापही त्याचा फारसा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाला नाही. या सर्व परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे सीतारामन यांनी सांगितले.