ETV Bharat / city

भूस्खलनामुळे बंद असलेला केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

5 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्ग येथील मार्गाच्या बाजूला ‘मलबार हिल’ परिसरातील टेकडीचे भूस्खलन झाले. त्यानंतर, महापालिकेने या भागाची पुनर्बांधणी करण्याचे काम तातडीने हाती घेतले. अखेर हा रस्ता खुला झाला आहे.

flyovers in mumbai
भूस्खलनामुळे बंद असलेला केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
author img

By

Published : Oct 15, 2020, 12:48 PM IST

मुंबई - मुसळधार पावसामुळे मलबार हिल येथील टेकडीचे भूस्खलन झाले. त्यात रस्ता आणि पुलाचे नुकसान झाले होते. पालिकेने या ठिकाणी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. नुकतेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलारसू, पोलीस अप्पर आयुक्त (वाहतूक) पडवळ संबंधित भागाची पाहाणी केली होती. त्यावेळी केम्प्स कॉर्नर उड्डाणपूल येत्या 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या पुलावरील वाहतूक आजपासून सुरू करण्यात आली आहे.

5 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती सीताराम पाटकर मार्ग येथील मार्गाच्या बाजूला ‘मलबार हिल’ परिसरातील टेकडीचे भूस्खलन झाले. त्यानंतर, महापालिकेने या भागाची पुनर्बांधणी करण्याचे काम तातडीने हाती घेतले. या कामासाठी आयआयटी, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक तज्ज्ञ समिती देखील नेमण्यात आली. यावेळी काम सुरू असलेल्या ठिकाणी पाहाणी करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू, अप्पर पोलीस आयुक्त पडवळ, महापालिका उपायुक्त (पायाभूत सुविधा) संजय दराडे तसेच अन्य अधिकारी आले होते.

या पाहणी दरम्यान संबंधित तज्ज्ञांशी, अभियंत्यांशी चर्चा करून वाहतूकीच्या दृष्टीने उड्डाणपूल 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच यासाठी उड्डाणूपलाचे आवश्यक ते दुरुस्तीकरण करून रस्त्याचे तातडीने नुतनीकरण करण्यात आले. त्यानुसार आजपासून हा उड्डाणपूल सुरू करण्यात आला आहे.

या कामासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार समितीमध्ये ख्यातनाम संरचनात्मक सल्लागारांसह भूगर्भशास्त्र तज्ज्ञांचाही समावेश आहे. या कामासाठी महापालिकेने एका तज्ज्ञ सल्लागार संस्थेचीही नेमणूक केली आहे. तांत्रिक तज्ज्ञ समितीने व तांत्रिक सल्लागार यांनी सादर केलेली संकल्प चित्रे व निविदा सूचना प्रकाशित झालेल्या आहेत. संबंधित निविदा प्रक्रियेअंती डिसेंबर 2020 मध्ये ‘मलबार हिल’ परिसरातील या टेकडीची पुनर्बांधणी व भूस्खलानामुळे प्रभावित झालेल्या 'न्यायमूर्ती सीतारात पाटकर' रस्त्याची पुनर्बांधणीचे काम सुरू होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.