मुंबई - पुण्यात येरवडा परिसरात असलेल्या शास्त्रीनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे ( Pune Building Slab Collapse ) त्यात पाच मजुरांचा मृत्यू ( Five Workers Died In Building Slab Collapse ) झाला. मृत्यू पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांसाठी राज्य सरकारने पाच लाख रुपये मदत म्हणून घोषित केली आहे. पुण्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून, या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावलेल्या मजुरांना पाच लाख रुपये मदत घोषित ( Compensation In Building Slab Collapse Case ) केली. ट्विट करून उपमुख्यमंत्र्यांनी ही मदत जाहीर केली.
-
पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर भागात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून ५ कामगारांना प्राण गमवावे लागणे हे दुर्दैवी,क्लेशदायक आहे.मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.सदर कुटुंबियांना शासनाकडून पाच लाख रु. मदत देण्यात येईल.भावपूर्ण श्रद्धांजली!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर भागात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून ५ कामगारांना प्राण गमवावे लागणे हे दुर्दैवी,क्लेशदायक आहे.मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.सदर कुटुंबियांना शासनाकडून पाच लाख रु. मदत देण्यात येईल.भावपूर्ण श्रद्धांजली!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 4, 2022पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर भागात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून ५ कामगारांना प्राण गमवावे लागणे हे दुर्दैवी,क्लेशदायक आहे.मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो.सदर कुटुंबियांना शासनाकडून पाच लाख रु. मदत देण्यात येईल.भावपूर्ण श्रद्धांजली!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 4, 2022
त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील या घटनेनंतर दुःख व्यक्त केलं. निर्मनाधिन इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे पाच मजुरांचा झालेल्या मृत्यूनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी दक्षता पाळली जावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी बांधकाम होत असलेल्या ठिकाणच्या त्रुटी लवकरात लवकर दूर कराव्यात. तसेच या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्यावर कडक कारवाईचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.