ETV Bharat / city

Government Teaching Colleges will be Closed : राज्यातील 'ही' शासकीय अध्यापक महाविद्यालये होणार बंद - मंत्री वर्षा गायकवाड - शासकीय अध्यापक विद्यालय

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील पाच शासकीय अध्यापक महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला ( Government Teaching Colleges will be Closed ) आहे. विद्यार्थी संख्येअभावी ही महाविद्यालय बंद करण्यात येत असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ( Minister Varsha Gaikwad ) दिली.

मंत्री वर्षा गायकवाड
मंत्री वर्षा गायकवाड
author img

By

Published : Jan 12, 2022, 5:23 PM IST

मुंबई - राज्यात एकूण 12 शासकीय अध्यापक महाविद्यालय कार्यरत होती. मात्र, यापैकी पाच महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाअभावी बंद करण्यात येत आहेत ( Government Teaching Colleges will be Closed ). गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने विद्यार्थ्यांचा अध्यापक महाविद्यालयांकडे ओढा नसल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ( Minister Varsha Gaikwad ) दिली.

कोणती महाविद्यालये होणार बंद ? - विद्यार्थी संख्येअभावी राज्यातील रायगड जिल्ह्यातील सासवणे शासकीय अध्यापक विद्यालय, माणगाव शासकीय अध्यापक विद्यालय, बीड जिल्ह्यातील नेकनूर शासकीय अध्यापक विद्यालय, अमरावती जिल्ह्यातील अमरावती शासकीय अध्यापक विद्यालय आणि पुणे जिल्ह्यातील उर्दू शासकीय अध्यापक विद्यालय बंद करण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालकांनी घेतला आहे. ही महाविद्यालये बंद करण्यात येत असल्याबाबत राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही दुजोरा दिला.

का होतात महाविद्यालय बंद ? - राज्यात अध्यापक महाविद्यालय म्हणजे डीएड महाविद्यालयांची संख्या एक हजार शंभर इतकी होती. मात्र, गेल्या काही वर्षात शिक्षकांची नोकरभरती झालेली नाही. त्यामुळे नोकरी मिळणार नाही, या कारणास्तव शिक्षकी पेशाकडे वळण्यास अथवा अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी उत्सुक नाहीत. यामुळे राज्यातील महाविद्यालयांची संख्या 2019-20 मध्ये 894 वर पोहोचली तर आता ती आणखी कमी होऊन 654 पर्यंत घसरली आहे. गेल्या काही वर्षांपासून शासनाने खासगी अध्यापक विद्यालयाचे वेतनेतर अनुदान बंद केले आहे. त्यामुळे केवळ अनुदानासाठी महाविद्यालय चालवली जात नाहीत, तर प्रयत्न करून आणि मोफत प्रवेश देऊनही विद्यार्थी येत नसल्याने संस्थाचालक हवालदिल झाले आहेत.

डीएड विद्यार्थ्यांनी सुरू केले व्यवसाय - गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षकांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता वय निघून जात असल्याने नवीन रोजगार शोधण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अनेकांनी वेगवेगळे मार्ग निवडले आहेत. त्यामुळेच आपणही उपजिविकेसाठी हॉटेल व्यवसाय सुरू केल्याची माहिती रवींद्र बारस्कर या पदवीधारकाने दिली.

हेही वाचा - रायगड किल्ला व परिसर विकासांच्या कामासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देणार - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.