ETV Bharat / city

Mumbai Corona : धारावी दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा तर वर्षभरात सातव्यांदा रुग्णसंख्या शून्यावर - मुंबई कोरोना अपडेट

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले त्यावेळी धारावीतही रुग्ण वाढू लागले होते. धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या काही दिवसात येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज तर धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

number of corona patients is zero in dharavi

author img

By

Published : Jun 14, 2021, 4:44 PM IST

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले त्यावेळी धारावीतही रुग्ण वाढू लागले होते. धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. मात्र गेल्या काही दिवसात येथील रुग्णसंख्या कमी झाली आहे. आज तर धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदा तर गेल्या वर्षभरात धारावीत सातव्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.

धारावी सातव्यांदा शून्यावर -

मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसारख्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीही कोरोनाने हॉटस्पॉट ठरली होती. १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै - ऑगस्टनंतर धारावीत रुग्ण संख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली. २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ ला दुसर्‍यांदा, २६ जानेवारीला तिसर्‍यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा तर ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मुंबईसह धारावी फेब्रुवारीनंतर पुन्हा कोरोनाचा प्रसार झाला त्यानंतर धारावीत आज १४ जून रोजी एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

धारावी मॉडेल -

१ एप्रिल २०२० ला धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरू केली. कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. धारावीत राबवण्यात आलेल्या मॉडेलची चर्चा देशभरात करण्यात आली तसेच हे मॉडेल अनेक ठिकाणी राबवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.