ETV Bharat / city

बीकेसी कोविड सेंटर-2 चे लोकार्पण; मात्र फिनिशिंगची कामे अद्याप सुरूच... - Mumbai Coronavirus News

बीकेसीच्या कोव्हिड-19 रुग्णालयाचे 17 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पण अद्याप या सेंटर-2 चे काम पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार असून त्यानंतर रूग्णसेवा सुरू होणार आहे.

बीकेसी कोविड सेंटर-2
बीकेसी कोविड सेंटर-2
author img

By

Published : Jun 20, 2020, 11:41 AM IST

मुंबई - गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीकेसीतील एमएमआरडीए मैदानात बांधण्यात आलेल्या बीकेसीच्या कोव्हिड-19 रुग्णालय-२ चे 17 जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पण अद्याप या सेंटर-2 चे काम पूर्ण झालेले नाही. हे काम पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार असून त्यानंतर रुग्णसेवा सुरू होणार आहे.

मुंबई महानगर पालिकेने मात्र सेंटर-1 मध्ये अजून काही बेड शिल्लक असून त्याची क्षमता संपल्यानंतर सेंटर-2 मध्ये रुग्ण भरती सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. तर सध्या सेंटर-2 ची फिनिशिंगची कामे बाकी असल्याचेही स्पष्ट केले आहे. सेंटर-1 मध्ये 1 हजार 28 बेड असून येथे सध्या 500 हुन अधिक सौम्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1 हजार बेडच्या सेंटर-2 मध्ये 100 आयसीयू बेड, 18 डायलिसिस बेड आणि उर्वरित ऑक्सिजन-नॉन, ऑक्सिजन बेड आहेत.

पालिका रुग्णालयात ओझीजन आणि आयसीयू बेडची कमतरता आहे. अशावेळी हे सेंटर-2 लवकर सुरू होणे गरजेचे आहे. पण या सेंटरचे 100 टक्के काम अजून पूर्ण झालेले नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)च्या माध्यमातून हे सेंटर-2 बांधण्यात आले आहे. याविषयी एमएमआरडीएसह महानगर आयुक्त बी.जी पवार यांनी अद्याप काही काम शिल्लक असल्याचे कबूल केले आहे.

पालिकेला-आरोग्य विभागाला आवश्यक त्या सुविधा कशा हव्या आहेत, ते त्यांनाच ठरवावे लागते. त्यामुळे आम्ही आमचे काम पूर्ण करत पालिकेला हे सेंटर हस्तांतरीत केले आहे. आता ते आवश्यकतेनुसार साधन सामग्री लावत सेंटरचे फिनिशिंगचे काम पूर्ण करून घेतील, असेही ते म्हणाले.

सेंटर-2 चे काम बाकी आहे. पण, अद्याप सेंटर 1 मध्ये बरेच बेड शिल्लक आहेत. त्यामुळे सेंटर-2 सुरू करण्यासाठी अवधी असल्याची माहिती अतिरिक्त महानगर आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तर या दोन्ही सेंटर साठी आवश्यक तेवढे डॉक्टर-नर्स आणि आरोग्य कर्मचारी पुरवण्यासाठीचे नियोजनही झाले आहे. त्यामुळे गरज पडल्यास तत्काळ सेंटर-2 सुरू करू असेही काकाणी यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.