मुंबई - बॉलिवूड निर्माता करिम मोराणी यांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. काही दिलसापूर्वी त्यांच्या मुली जोआ आणि शजा याच्याही चाचण्या पॉझिटीव्ह आल्या होत्या. गायिका कनिका कपूर, अभिनेता पूरब कोहली आणि करिम यांची मुलगी अभिनेत्री जोआ यांच्यानंतर सेलेब्रिटीच्या यादीत निर्माता करिम मोराणी यांचेही नाव सामील झाले आहे. कनिकाची कोरोना टेस्ट आता पॉझिटीव्ह आली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
६ एप्रिल रोजी शजा मोरानी आणि तिची बहिण जोआ मोराणी यांची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. दोघींच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात इलाज सुरू आहे.
करिम यांचे भाऊ मोहम्मद कोरोानी यांनी सांगितले, ''करिम भाईंची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. आज सकाळीच रिपोर्ट मिळाला. त्यांच्यावर नानावटीमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची पत्नी आणि बाकी स्टाफची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. ''
करिम यांनी अनेक गाजलेल्या बॉलिवूड सिनेमाची निर्मिती केली आहे. यात शाहरुख खानच्या 'रा.वन', 'चेन्नई एक्सप्रेस', 'हॅप्पी न्यू ईयर' आणि 'दिलवाले' यासारख्या सिनेमांचा समावेश आहे.
करिम मोराणी यांची मुलगी शजा काही दिवसापूर्वी श्रीलंकेतून परतली होती. सुरूवातीला तिची लक्षणे दिसली नाहीत. मात्र त्यानंतर टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. तर जोआ मार्च महिन्याच्या मध्यात राजस्थानहून परतली होती. तिची सुरूवातीची टेस्ट निगेटीव्ह आली होती. मात्र तिला नंतर संक्रमण झाले.
संपूर्ण मोराणी परिवार आता क्वारंटाईनमध्ये आहे.