मुंबई - शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोरोना काळात मिरवणूक काढण्यास परवानगी नसताना मिरवणूक काढून कोरोनाचे नियम तोडल्याप्रकरणी अबू असीम आझमींसह 18 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच आमदार अबू आझमी व समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण? -
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्तांनी मोठ्या जल्लोषात रथावरून त्यांची मिरवणूक काढली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी कोरोनानियमांचा फज्जा उडवत कोरोना नियमांची पायमल्ली केली होती. तसेच, यावेळी आमदार अबू आझमी आणि समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते फवाद खान ऊर्फ आझमी यांनी विनापरवाना तलवार देखील हातामध्ये घेतली होती. या प्रकरणी त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८, २६९ सह कलम ११ महाराष्ट्र कोव्हिड उपाययोजना २०२० सह कलम ४, २५ भाहका. सह ३७ (अ) (१), १३५ मपोका. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल -
आमदार अबु असिम आझमी, फवाद खान उर्फ आझमी, इरफान खान, गैसउददिन शेख, आयशा खान, अक्तर कुरेशी, मनोज सिंग, सददाम खान, तौसीफ खान, जावेद सिद्दिकी, नौशाद खान, वसिम जाफर शेख, अकबर खान, इर्शाद कुरेशी ऊर्फ बबलू लोटस, रईसा सय्यद, शेहजाद ऊर्फ सय्यद, शकील पठाण, रुक्साना सिद्दिकी यांच्यासह आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - मुंबईकरांसाठी सर्वात मोठी बातमी, 15 ऑगस्टपासून लसवंतांसाठी लोकल सुरू