ETV Bharat / city

मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेल आता एफडीएच्या रडारवर; तपासणी मोहिमेला सुरुवात - mumbai fda news

सोमवारपासून (8 मार्च) मुंबईतल्या नामांकित पंचतारांकित हॉटेलची तपासणी मोहीम सुरू केली आहे. आता या तपासणीत कोणत्या हॉटेलची पोलखोल होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

fda
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 9, 2021, 4:48 PM IST

मुंबई - गेल्या आठवड्यात अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने वांद्रे पश्चिम येथील नामांकित अशा ताज लॅण्डस एंड या पंचतारांकित हॉटेलविरोधात कारवाई केली होती. या कारवाईतुन पंचतारांकित हॉटेलमधील स्वच्छतेचा आणि सुरक्षित अन्न पदार्थांचा पर्दाफाश झाला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकारामुळे पंचतारांकित हॉटेलमधील अन्न सुरक्षा मानके कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे आता एफडीएने आपला मोर्चा मुंबईतील बड्या पंचतारांकित हॉटेलकडे वळवला आहे. कालपासून (सोमवार, 8 मार्च) मुंबईतल्या नामांकित पंचतारांकित हॉटेलची तपासणी मोहीम सुरू केली आहे. आता या तपासणीत कोणत्या हॉटेलची पोलखोल होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील पंचतारांकित हॉटेलवर आता एफडीएची नजर

हेही वाचा - अर्थसंकल्पीय अधिवेशन LIVE Updates : 'अन्वय नाईक प्रकरणी माझी चौकशी करा'; फडणवीसांचं गृहमंत्र्यांना खुलं आव्हान!

झुरळांचा सुळसुळाट आणि मुदतबाह्य अन्न पदार्थ

पंचतारांकित हॉटेल म्हटले की ते अतिशय स्वच्छ, तेथे उपलब्ध असणारे अन्न पदार्थ सर्वोत्तम दर्जाचे आणि ताजे असा समज असतो. पण एफडीएने ताज लॅण्डस एंड हॉटेलवर केलेल्या कारवाईतुन पंचतारांकित हॉटेलमधील वस्तुस्थिती समोर आली आहे. तर ही पंचतारांकित हॉटेलच कसे ग्राहकांच्या जीवाशी खेळत आहेत आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याची कशी 'ऐशी की तैशी' करत आहेत हे समोर आले. या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुदतबाह्य ज्यूस, चीझ, बटर आणि अन्य अन्न पदार्थ आढळून आली. तर फ्रीजमध्ये योग्य तापमान ही राखले जात नव्हते. त्याचबरोबर धक्कादायक बाब म्हणजे या हॉटेलच्या स्टोरेज रूममध्ये झुरळांचा सुळसुळाट होता. याची गंभीर दखल घेत एफडीए या हॉटेलविरोधात आता कडक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार लवकरच त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शशिकांत केकरे, सहआयुक्त, बृहन्मुंबई, (अन्न ), एफडीए यांनी दिली आहे.

हेही वाचा - मनसुख हिरेनची हत्या झाल्याचा संशय? दोन मोबाईलचे दोन वेगवेगळे लोकेशन

आता मोर्चा अन्य बड्या पंचतारांकित हॉटेलकडे

रस्त्यावरच्या अन्न पदार्थ विक्रेत्याकडून स्वच्छतेची वा सुरक्षित अन्न पदार्थ पुरवण्याची काळजी घेतली जात नसल्याचे म्हणत एफडीएकडून रस्त्यावरचे अन्न पदार्थ विक्रेते, फूड स्टॉल, हातगाडीवर अन्न पदार्थ विक्री करणारे आणि छोटी हॉटेल यावरच नियमित कारवाई केली जाते. पण पंचतारांकित हॉटेल विरोधात कारवाई झाल्याचे खूपच कमी पाहायला मिळते. त्यानुसार आता बऱ्याच वर्षांनी पंचतारांकित हॉटेलवर कारवाई झाली असून पंचतारांकित हॉटेल ही अन्न सुरक्षा कायद्याचे राजरोसपणे उल्लंघन करत असल्याचे समोर आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आता आम्ही मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेलची तपासणी सुरू केली आहे. अनेक बड्या हॉटेलची तापसणी यात होणार असल्याचे केकरे यांनी सांगितले आहे. तर या तपासणीत दोषी आढळणाऱ्या पंचतारांकित हॉटेलविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. एकुणच आता बडी पंचतारांकित हॉटेल एफडीएच्या रडारवर असून आता कोणत्या नामांकित हॉटेलमध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करत ग्राहकांच्या जीवाशी खेळले जात आहे हे लवकरच समजेल.

हेही वाचा - मुंबईत अंशतः लॉकडाऊनचे संकेत, हॉटस्पॉटमधील सोसायट्यांना नोटिसा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.