मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' या दैनिकाच्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे यांना पितृशोक झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे आणि रश्मी ठाकरे यांचे वडील माधव गोविंद पाटणकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

अंधेरी येथील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ६ वाजता शिवाजी पार्क येथे निवडक नातेवाइकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी निधन झाल्यानंतर दु:ख व्यक्त करणारेे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. ठाकरे आणि पाटणकर कुटुंबाच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.