मुंबई - शहरातील मध्यवर्ती दादर भागात ढगाळ वातावरण आणि तुरळक पाऊस असताना देखील मतदारांचा उत्साह ओसंडून वाहतोय. सकाळपासूनच मतदारसंघात मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक परिवार सहपरिवार मतदानाचा हक्क बजावताना पाहायला मिळत आहे. त्यातच नवमतदारांनी आपल्या कुटुंबासह सेल्फी काढून पहिल्यांदाच मतदान केल्याचा आनंदही व्यक्त केल्याचे पहायला मिळत आहे.
हेही वाचा... मतदान कार्ड नसले तरी चिंता नको...'या' 11 ओळखपत्रांचा करू शकता वापर
माहिम मतदारसंघातल्या बालमोहन मंदिर या मतदारसंघात सुधीर गोडबोले परिवार सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. या परिवारासोबत गायत्री गोडबोले या अठरा वर्षाच्या युवतीने मतदान केले. पहिल्यांदाच मतदान करत असल्याचा आनंद कुटुंबासह सेल्फी काढून व्यक्त केला. मतदान करणे आवश्यक असून आपल्या मताचे सरकार आपल्या विचारांचे सरकार येण्यासाठी सर्वांनी मतदान करावं असा आवाहन या युवतीने केले. तर आई सुषमा गोडबोले यांनी मतदानाचा हक्क बजावा नंतर सरकारला जाब विचारावा त्यासाठीच मतदान आवश्यक असल्याचे सांगितले. बाल मोहनच्या याच मतदान केंद्रात राज ठाकरे आपल्या कुटुंबीयासह मतदान करणार आहेत.