मुंबई - मुंबई क्राइम ब्रँच युनिट 7 च्या इस्मन घरातून बनावट नोटा छापून मुंबई व आसपासच्या बाजारात 100 च्या बदल्यात 200 रुपये देणार्या चार जणांच्या टोळीला अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी सांगितले की, गुन्हे शाखा युनिट 7 च्या टीमला 26 जानेवारी रोजी काही लोक बनावट नोटा पुरवठा करण्यासाठी शहरात येणार असल्याची माहिती मिळाली होती.
नोटबंदीनंतर बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या वतीने पर्दाफाश करण्यात आला आहे. भारतीय चलनातील बनावट नोटा तयार करून देश विघातक कृत्याद्वरे देशाच्या आर्थिक स्थैर्यास धोका निर्माण करणाऱ्या टोळीस पोलिसांनी अटक केली आहे. या बनावट नोटा घेऊन काही व्यक्ती पूर्व द्रुतगती मार्ग विक्रोळी या भागात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यामध्ये अब्दुल्ला खान (24 वर्ष), महेंद्र खेडेकर (50 वर्ष), फारूक चौरसिया (33 वर्ष) व आमीन शेख (41, वर्ष) यांना अटक केली आहे. यांच्याकडून 20,00 रुपयांच्या 310 नोटा, 500 रुपयांच्या 4,217 नोटा, 200 रुपयांच्या 2,276 नोटा, तर 100 रुपयांच्या 3,703 नोटा अशा एकूण 35 लाख 54 हजार रुपयांच्या बनावट नोटा व छपाईसाठी वापरलेली प्रिंटर, स्कँनर, पेपर, इंक बॉटल हस्तगत केले आहे. यांना न्यायालयात हजर केले असताना 3 फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा कोणत्या भागात बनावट नोटा वितरित केल्या आहेत याविषयी पोलिसांकडून तपास केला जात आहे.