ETV Bharat / city

बेस्ट कर्मचाऱ्यांना सुविधा द्या, बेस्ट समिती अध्यक्षांचे निर्देश

author img

By

Published : Apr 26, 2021, 7:32 PM IST

बेस्ट समिती अध्यक्षांनी २४ एप्रिलला उपक्रमाच्या वडाळा, प्रतीक्षानगर, आणिक व वांद्रे आगाराला भेट दिली. यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांना सुविधा द्या, असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्षांनी दिले आहेत.

मुंबई
मुंबई

मुंबई - मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळख असलेले बेस्ट उपक्रमातील कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येतात. हे कर्मचारी गेले वर्षभर कोरोना विरोधात लढाईत रस्त्यावर उतरून काम करत आहेत. मात्र, त्यांना विश्रांतीगृहात कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या मिळत नाहीत. यासाठी १००० फॅन्स व २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे असे निर्देश बेस्ट समिती अध्यक्ष चेंबूरकर यांनी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त व बेस्टचे महाव्यवस्थापक पी. वेलरासू यांना दिले आहेत.

गलथान प्रकार -

बेस्ट आर्थिक संकटात आहे. मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार होत आहे. या प्रसारादरम्यान गेले वर्षभर बेस्टचे कर्मचारी अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांना ने आण करण्याचे काम करत आहेत. कोविड -१ ९ च्या संदर्भात उपक्रमाचे बसचालक व बसवाहकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. या निमित्ताने २४ एप्रिलला उपक्रमाच्या वडाळा, प्रतीक्षानगर, आणिक व वांद्रे आगाराला भेट दिली असता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक गलथान प्रकार पाहावयास मिळाल्याचे चेंबूरकर यांनी यांनी संगितले.

बेस्ट प्रशासनाला निर्देश -

उपक्रमातील बसचालक, बसवाहक व परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहांची २ वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आलेली नाही. फॅन, कुलर नादुरुस्त अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत देखील उपक्रमातील बसचालक, बसवाहक व परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचारी काम करत आहेत. त्यामुळे बसचालक, बसवाहक व परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीगृहाकरता १००० फॅन्स व २०० कुलर्स तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावे, असे निर्देश चेंबूरकर यांनी दिले आहेत. जेणेकरुन, उपक्रमातील बसचालक, बसवाहक व परिवहन अभियांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकेल असे चेंबूरकर यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.