ETV Bharat / city

Mumbai Crime : विवाहबाह्य संबंध जीवावर बेतले; मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू

author img

By

Published : Oct 7, 2022, 10:15 PM IST

Mumbai Crime: पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत कुणकुण लागताच पतीने प्रियकराला एका खोलीत बोलावून लाथाबुक्क्यांसह लाकडी बांबू, पट्याने बेदम मारहाण केली Beaten badly आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रियकर तरुणाचा आठवड्याभराच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी Bhandup Police तिघांविरोधात गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime

मुंबई: पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत कुणकुण लागताच पतीने प्रियकराला एका खोलीत बोलावून लाथाबुक्क्यांसह लाकडी बांबू, पट्याने बेदम मारहाण केली Beaten badly आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या प्रियकर तरुणाचा आठवड्याभराच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये घडली आहे. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी Bhandup Police तिघांविरोधात गुन्हा नोंदवत दोघांना अटक केली आहे.

विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर भुडकु पटाईत (५५ ) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे. २६ सप्टेंबरला सूरजला मारहाण झाल्याचे समजले. सुरजचा काही इसमांसोबत वाद झाला होता. उपचाराकरीता त्याला मुलुंड जनरल रुग्णालय येथे दाखल केले असून त्याची तब्येत सुधारत होती. त्याच्या भावाला याबाबत कळवताच त्याने सूरजची भेट घेतली. सुरजकडे केलेल्या चौकशीत त्यांचे एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत तिचा पती अविनाश तोरणेला कळाल्यानंतर त्याने प्रतापनगर येथे बोलावून घेतले. तेथे त्याच्यासह अश्विन तोरणे व रुपेश भिसे यांनी लाकडी बांबू, चामडयाचा पट्टा आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बदनामीच्या भीतीने तक्रार दिली नसल्याची माहिती दिली.

उलटी होण्याचा त्रास सुरु सुरज हा मुलुंड जनरल रुग्णालय येथे उपचार घेत असताना तेथे सोनोग्राफीची सुविधा नसल्याने २६ सप्टेंबर रोजी रात्री सायन रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथे त्याचा एक्सरे आणि सोनोग्राफी काढण्यात आला होता. एक्सरेमध्ये त्याच्या डाव्या हाताच्या मनगटास फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले होते. दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. तेथून त्याला रायगडला गावी नेले. तेथे काहीही खाल्ले तर सुरजला उलटी होण्याचा त्रास सुरु झाला.

पोलिसांची माहिती ३० तारखेपासून त्याला श्वास घेण्यास त्रास झाल्याने तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले होते. सोनोग्राफीत पोटात पाणी झाल्याचे निष्पन्न झाले. तेथून त्याला पुन्हा सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी व्हेंटिलेटरवर असलेल्या सुरजचा ४ ऑक्टोबरला मृत्यू झाला आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अविनाश अशोक तोरणे ( ३१ ), अश्विन अशोक तोरणे (२६ ) यांना अटक केली असून पाहिजे आरोपी रुपेश भिसे याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.