ETV Bharat / city

RTE Admission : विद्यार्थी-पालकांना दिलासा; आरटीई प्रवेशासाठी आता 9 जुलैपर्यंत मुदतवाढ - आरटीई ऑनलाईन प्रवेश

आरटीईअंतर्गत प्रवेशाची (RTE Admissions) मुदत 30 जून रोजी संपुष्टात आली होती. ओटीपीसंदर्भातील तांत्रिक कारणांमुळे प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश निश्चितीसाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension for RTE admissions till 9 July in Maharashtra)

RTE Admission : विद्यार्थी-पालकांना दिलासा; आरटीई प्रवेशासाठी आता 9 जुलैपर्यंत मुदतवाढ

author img

By

Published : Jul 1, 2021, 5:35 PM IST

मुंबई : विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अर्थात आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यास 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाची मुदत 30 जून रोजी संपुष्टात आली होती. ओटीपीसंदर्भातील तांत्रिक कारणांमुळे प्रवेश निश्चित करण्यात अडचणी येत असल्याची बाब लक्षात घेऊन शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश निश्चितीसाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension for RTE admissions till 9 July in Maharashtra)

ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत वाढ
तांत्रिक कारणांमुळे आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यात पालकांना अनेक अडचणी येत आहेत. बहुतांश पालक हे मूळ गावी असल्याने त्यांना शाळेत जाऊन प्रवेश घेता येत नाही. त्यामुळे पहिल्या यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्याची मुभा देण्यात आली आहे. पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना मिळणार्‍या ओटीपी मेसेजमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे यादीतील बालकांना प्रवेश घेण्यासाठी आणि गटशिक्षणाधिकारी यांना ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यासाठी 9 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयातर्फे घेण्यात आला आहे.

प्रवेशासाठी आणखी एक संधी?
ज्या पालकांना प्रवेशासाठी शाळेत जाणे शक्य झाले नाही किंवा ज्या पालकांना अजूनही लॉटरी लागल्याचे कळले नाही. त्यांना एसएमएस करून शाळेत प्रवेश घेण्यासंदर्भात कळविण्यात यावे असे आदेश शिक्षण संचालनालयाचे संचालक द गो जगताप यांनी राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका प्रशासन आणि शिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत. त्यामुळे प्रवेश घेण्यात अडचणी येत असलेल्या पालकांना प्रवेशासाठी आणखी एक संधी मिळाली आहे.

८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची झाली निवड
विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, प्राथमिक शिक्षण संचालनालयाद्वारे खासगी शाळांमधील २५ टक्के जागांवर आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश मिळत असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांचे लक्ष आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे लागलेले असते. यंदा आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातील ९ हजार ४३१ शाळांमध्ये ९६ हजार ६२९ जागा उपलब्ध आहेत. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई प्रवेश प्रक्रियेची सोडत ३ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली. त्यानुसार, आतापर्यंत आरटीई प्रवेशासाठी राज्यभरातून ९६ हजार ६८४ जागांसाठी २ लाख २२ हजार ५८४ अर्ज आले आहे. यातील आतापर्यंत ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तसेच निवड झालेल्यांपैकी पहिल्या फेरीत ३२ हजार ३२२ विद्यार्थ्यांची शाळेत प्रवेशासाठी नोंदणी केलेली आहे. तर १५ हजार २२१ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे.

हेही वाचा - आरटीई प्रवेशासाठी ८२ हजार १२९ विद्यार्थ्यांची झाली निवड; फक्त १५ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.