ETV Bharat / city

Big Breaking : पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्ण - Breaking NEWS

Big Breaking
Big Breaking
author img

By

Published : Dec 5, 2021, 12:15 PM IST

Updated : Dec 5, 2021, 8:45 PM IST

20:43 December 05

वरळीत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दोन कामगार पडले, एकाचा मृत्यू

मुंबई - वरळीत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून दोन कामगार खाली पडले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्याला उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याने सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, वरळी येथील लेडी रतन हाऊसिंग कॉम्प्लेक्स इमारत क्रमांक चार साई सदन को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटीतील बाहेरील बाजूस पाईप टाकण्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु असताना अकरम शेख (४९) व प्रशांत मजुमदार (५०) हे दोघे कामगार इमारतीवरून खाली पडले. या दोघांना जखमी अवस्थेत नायर रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी प्रशांत मजुमदार यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर शेख यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

19:50 December 05

गिरीश कुबेरांवरील हल्ल्याची घटना निंदनीय - शरद पवार

  • साहित्य संमेलनात शरद पवार
  • गिरीश कुबेर यांच्यावरील हल्ला निंदनीय
  • कोणत्याही प्रकार या हल्ल्याचे समर्थन नाही
  • महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे
  • मी गिरीश कुबेर यांचं पुस्तक वाचलंय, काही मुद्द्यांवर वाद आहे
  • मात्र, त्या खोलात मी गेलो नाही
  • भूमिका मान्य नसेल तर वैचारिक चर्चा होऊ शकते
  • कोणत्याही संघटनेनं असा हल्ला करणं शोभत नाही
  • महाराष्ट्राची ही संस्कृती नाही

19:15 December 05

पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्ण

पुणे - पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव, पिंपरी-चिंचवडमध्ये 6 तर पुण्यात 1 रुग्ण

16:59 December 05

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा काँग्रेसकडून निषेध

अहमदनगर - नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनस्थळी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकीचा काँग्रेसकडून निषेध

  • काँग्रस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे, की विचारांचा लढा विचारांनी व्हावा
  • संभाजी ब्रिगेडनं हे समजून घ्यायला हवं
  • महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे
  • गिरीश कुबेर यांच्यावर शाई फेकल्याची घटना दुर्दैवी, असल्याचे थोरात यांनी म्हटले
  • अभ्यासपूर्ण लेखन असावं, न पटलं तर वैचारिक लढा करावा
  • योग्य त्या सरकारी यंत्रणा कारवाई करणार

15:03 December 05

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे.

14:54 December 05

ठाण्यात खड्यातील पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू

  • ठाणे - ठाण्यातील वर्तक नगरच्या मिल्ट्री ग्राउंड परिसरातील खड्यातील पाण्यात बुडून 11 वर्षीय दोन मुलाचा मृत्यू
  • अभिषेक बबलू शर्मा आणि कृष्णा मनोज गौड अशी बुडालेल्या मुलांची नावे
  • घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिस दाखल

13:23 December 05

ठाण्यात परदेशातून आलेल्या 4 जणांना कोरोनाची लागण

  • ठाणे - ठाण्यात परदेशातून आलेल्या 4 जणांना कोरोनाची लागण
  • तीन जण नेदरलँडवरून आले असून तिघेही एकाच कुटुंबियातील सदस्य
  • तर एक जण कॅनेडातून आला
  • ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण आहे का, याची तपासणी करण्यासाठी अहवाल पुण्याला पाठवला
  • चारही जणांना पालिकेच्या देखरेखीखाली विलगिकरणात ठेवण्यात आले

12:40 December 05

श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात बिबट्याचा मुलावर हल्ला

  • अहमदनगर - श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात बिबट्याचा मुलावर हल्ला
  • येथील सदावर्ते हॉस्पिटल रोडवर दिसला बिबट्या, बिबट्याचा मुलावर हल्ला
  • जखमी मुलाला साखर कामगार रुग्णालयात केले दाखल
  • लोक वस्तीत बिबट्या घुसल्याने नागरिकांमध्ये घबराट
  • वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल, बिबट्याचा शोध सुरू

12:03 December 05

खासदार शरद पवार संमेलनास्थळी दाखल

कुसुमाग्रज नगरी (नाशिक) - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी साहित्य संमेलनस्थळी भेट दिली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्वागत केले. साहित्य संमेलनातील शिवाजी तुपे चित्रकला प्रदर्शनाला ते भेट देता आहे. त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ आणि समीर भुजबळ उपस्थित आहे.

Last Updated : Dec 5, 2021, 8:45 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.