आज 'या' बातम्यांवर असेल नजर -
प्रियंका गांधी शेतकऱ्यांची भेट घेणार
उत्तरप्रदेशमधीरल लखीमपूर खीरीत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर राजकारण तापलं आहे. काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी मध्यरात्रीच लखीमपूरकडे रवाना झाल्या आहेत. पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळी न जाण्यास सांगितले होते. मात्र प्रशासनाकडे कोणताही आदेश आणि वॉरेंड न नसल्याने प्रियंका गांधी न जुमानता लखीमपूरकडे रवाना झाल्या.
IPL सामना
मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स
कालच्या महत्वाच्या बातम्या -
व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सोशल मिडिया प्लॅटफॉर्म अचानक बंद
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरात डाऊन झाले आहे. काल रात्री 9.15 वाजताच्या सुमारास, तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अचानक बंद झाले. त्यामुळे वापरकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
या पाच कारणांमुळे आर्यन खानच्या एनसीबी कोठडीत वाढ
ड्रग्स पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह तिघांची एनसीबी कोठडी वाढविण्यात आली आहे. न्यायालयाने या तिघांना सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत पाठविले आहे. त्यांची एनसीबी कोठडी का वाढविण्यात आली, पाहुया याची काही कारणे..
CSK vs DC : चेन्नईवर दिल्ली भारी; तीन गडी राखून मिळवला विजय
नाणफेक जिंकलेल्या दिल्लीच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत चेन्नईला २० षटकात ५ बाद १३६ धावांवर रोखले. चेन्नईचे स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतकी भागीदारी उभारली. रायुडूने नाबाद अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दिल्लीने शंभर धावांच्या आत आपले सहा फलंदाज गमावले.
Maharashtra Corona Update - रुग्णसंख्या घटली, राज्यात 2026 नवे रुग्ण तर 26 जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. गेले दोन दिवस 2 हजार 600 रुग्ण आढळून आले आहेत. त्यात आज (सोमवारी) घट होऊन रविवार 4 ऑक्टोबरला 2 हजार 026 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णांची ही नोंद आहे. आज (सोमवारी) 26 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून 5 हजार 389 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लखीमपूर खीरी हत्याकांड : समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना लखनऊ पोलिसांनी घेतले ताब्यात
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील हिंसाचारानंतर संपूर्ण देश राजकीय आखाडा बनला आहे. विरोधीपक्षातील अनेक नेत्यांना लखीमपूर जाऊन शेतकऱ्यांना भेटायचे आहे. दरम्यान, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लखीमपूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना लखनऊ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.