आज या घडामोडींवर असणार नजर
१ - मुंबईत आजपासून सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार, मॉल अन् चित्रपटगृह बंदच
मुंबई - कोरोनाची लाट आटोक्यात येत असल्याने 'ब्रेक द चैन'अंतर्गत निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल. तर पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी असणार आहे, असे परिपत्रक मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी जारी केले आहे. वाचा सविस्तर मुंबई पालिकेचे नवे नियम
२ - मुंबईत आज लसीकरण राहणार बंद
मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. या दरम्यान नागरिकांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा तुटवडा भासत असल्याने लसीकरण मोहीम अनेकवेळा ठप्प झाली आहे. लसीचा साठा नसल्याने आज बुधवारी ४ ऑगस्ट रोजी लसीकरण बंद राहणार आहे. त्यामुळे महापालिका आणि सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्र बंद राहतील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. वाचा, आतापर्यंत मुंबईत किती झाले 'लसवंत'
३ -कर्नाटकमधील बसवराज बोम्मई मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार
बंगळुरू - कर्नाटकचे नवनियुक्त मुख्यमंत्री आज दिल्लीतून बंगळुरूमध्ये परतणार आहेत. त्याचबरोबर आज बसवराज मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांचा शपथविधी समारंभ राजभवनात होण्याची शक्यता आहे.
४- VIDEO : कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य
कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य पाहा व्हिडिओ
५ - Tokyo Olympics Day 13 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज बॉक्सिंगबरोबरच महिला हॉकी सामन्यावर असणार नजर
हैदराबाद - टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत भारताच्या खात्यात दोन पदक आहेत. आज भारतीय अॅथलिट 13 व्या दिवशी ( 4 ऑगस्ट) पदक जिंकण्याच्या इराद्याने मोदानात उतरतील. भारतीय खेळाडू आज १३ व्या दिवशी अनेक क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधीत्व करतील. एकीकडे बॉक्सर लवलीनाला सेमीफायनल जिंकून फायनलमध्ये जाण्याची संधी आहे. कुस्तीमध्येही भारतीय पैलवान शक्ती आजमावतील. भारतीय महिला हॉकी सामन्यावरही सर्वांची नजर असेल. आजचा सामना जिंकून भारतीय महिला फायनलमध्ये धडक देण्याच्या इराद्याने उतरतील.
कालच्या महत्वाच्या बातम्या -
१ - धक्कादायक : ऑनलाइन क्लास सुरू असतानाच सुरू झाला पॉर्न व्हिडीओ; त्यानंतर घडला 'हा' प्रकार..
पुणे - जिल्ह्यातील राजगुरूनगर येथील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू असताना अचानक एक अश्लील व्हिडिओ सुरू झाला. यामुळे अतिशय विचित्र स्थिती निर्माण झाली होती. या प्रकारानंतर या खासगी शाळेने खेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून या प्रकाराचा तपास व्हावा, अशी मागणी केली आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने ही तक्रार दाखल केली आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकार
२ - ..म्हणून शरद पवारांनी अमित शाहंच केलं अभिनंदन; वाचा भेटीचं कारण
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रीय साखर सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी असलेल्या अमित शाहंकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे शरद पवारांनी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केल्याची माहिती पवारांनी ट्विटरवरून दिली. वाचा सविस्तर
३- महाराष्ट्रात कोरोना रुग्ण, मृत्यूसंख्या वाढली; ६ हजार ५ नवे रुग्ण, १७७ रुग्णांचा मृत्यू
मुंबई - राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ६,९५९ रुग्णांची शनिवारी नोंद झाली होती. रविवारी किंचित घट होऊन ६,४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी आणखी घट होऊन ४,८६९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज (मंगळवारी) त्यात पुन्हा वाढ होऊन ६ हजार ५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी १९०, शुक्रवारी २३१, शनिवारी २२५, रविवारी १५७, सोमवारी ९० मृत्यूची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १७७ मृत्यूची नोंद झाली आहे. वाचा सविस्तर
४ - बापरे.. शस्त्रक्रिया करून एक महिन्याच्या बाळाच्या पोटातील काढला गर्भ ! नवजात बाळाला जीवदान
मुंबई - एक महिन्यांच्या बाळाच्या पोटात गर्भ.. बापरे, विश्वास बसत नाही ना.. पण हे खरं आहे. महालक्ष्मी येथील नारायण हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये अशा एका नवजात बाळाच्या पोटात गर्भ आढळून आला होता. डॉ. सरिता भागवत या बालरोग तज्ज्ञांनी अतिशय नाजूक, कठीण आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया करत महिन्याच्या बाळाला जीवदान दिले.वाचा सविस्तर
५ - बारावीचा निकाल जाहीर! यंदाही मुलींचीच बाजी; कोकण राज्यात अव्वल
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. कोरोनाच्या पाश्वभूमीवर यंदाही परीक्षा रद्द करण्यात आली होती. यंदा बारावीचा निकाल हा 99.63 टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा निकाल हा 99.45 टक्के, तर कला शाखेचा 99.83 टक्के आणि वाणिज्य शाखेचा 99.91 टक्के तर उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल 98.80 टक्के इतका लागला आहे. जाणून घ्या राज्याचा संपूर्ण निकाल
६ - यंदाचा स्वांतत्र्यदिनाचा लाल किल्ल्यावरील कार्यक्रम असणार विशेष, मोदींकडून खास पाहुण्यांना निमंत्रण
नवी दिल्ली - यंदाचा स्वातंत्र दिनाचा सोहळा खास असणार आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं आहे. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं जाणार आहे. यादरम्यान, मोदी खेळाडूंशी बोलणार आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.जाणून घ्या यंदाच्या स्वातंत्र्यदिनाचे काय आहे वैशिष्ट्ये आणि कोण आहेत खास पाहुणे
७ - Tokyo Olympics: सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारी ही मुलगी आहे तरी कोण?
मुंबई - जपानच्या टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. खेळाडूंच्या या महाकुंभ मेळ्यात खेळाडू चांगली कामगिरी करत आपली वाहवा मिळवत आहेत. या दरम्यान, काही सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या फोटोमधील काही मुलींचा तर ऑलिम्पिकशी काही संबंध देखील नाही. वाचा ही सुंदर बाला कोण आहे
-
2M VIEWS FOR THE ARCHERY GODDESS TZUYU 🔥pic.twitter.com/d7ky3Pkpcv
— tzuyu supporter (@prodigytzu) August 1, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">2M VIEWS FOR THE ARCHERY GODDESS TZUYU 🔥pic.twitter.com/d7ky3Pkpcv
— tzuyu supporter (@prodigytzu) August 1, 20212M VIEWS FOR THE ARCHERY GODDESS TZUYU 🔥pic.twitter.com/d7ky3Pkpcv
— tzuyu supporter (@prodigytzu) August 1, 2021
८ - अभिनेत्री सारा अली खानने आई-वडिलांची 'नाक काट दी मैने' म्हणत मागितली माफी
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिच्या नाकाला दुखापत झाल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिच्या इन्स्टाग्राममधील पोस्टमध्ये तिच्या नाकाला जखम झालेली दिसत आहे परंतु दुखापतीमुळे तिने आपली विनोदबुध्दी हरवू दिलेली नाही. वाचा काय आहे प्रकरण
ईटीव्ही भारत विशेष -
१ - ओटीटीवर भव्य नसल्या तरीही आशयघन कथा - मृणाल कुलकर्णी
मुंबई - अभिनेत्री मृणाल कुलकर्णी प्लॅनेट मराठीसोबत जोडलेली आहे. यानिमित्ताने तिच्याशी विविध विषयांवर ईटीव्ही भारतने खास बातचीत केली. या गप्पांमध्ये मृणालने आजोबा गो.नी. दांडेकर यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या. काम करताना खासगी आणि व्यावसायिक जीवनाचा समतोल कसा साधायचा याच्याही टिप्स दिल्या. आपल्या मुलाला आज पडद्यावर काम करताना पाहून त्याच्या दिग्दर्शित चित्रपटामध्ये काम करण्याचीही इच्छा व्यक्त केली. पाहा मृणाल कुलकर्णींची संपूर्ण मुलाखत
२- ETV Bharat Special:वर्क फ्रॉम होम सोबतच "फार्म वर्क" करणाऱ्या भावांची कहाणी, पाहा VIDEO
उस्मानाबाद: लॉकडाऊनदरम्यान वर्क फ्रॉम होम करत असतानाच माळरानावर नंदनवन फुलविण्याची किमया उस्मानाबादमधील दोन इंजिनिअर भावांनी करून दाखविली आहे. पंकज कावळे आणि उदय कावळे अशी या भावांची नावे असून त्यांची शेती करण्याची जिद्द सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. जाणून घ्या याविषयी या खास रिपोर्टमधून.. पाहा व्हिडिओ