ETV Bharat / city

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 'ईटीव्ही भारत'चे पत्रकार नितीन बिनेकर कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्काराने सन्मानित

author img

By

Published : Jan 8, 2022, 8:07 PM IST

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून पत्रकार दिनानिमित्त 'ईटीव्ही भारत'चे पत्रकार नितीन बिनेकर यांना सन्मानित केले. कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घर दुरुस्ती व दलितोद्धार क्षेत्रात उल्लेखनीय पत्रकारिता केल्याबद्दल त्यांना कॉ. तु. कृ. सरमळकर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 'ईटीव्ही भारत'चे पत्रकार नितीन बिनेकर कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्काराने सन्मानित
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 'ईटीव्ही भारत'चे पत्रकार नितीन बिनेकर कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्काराने सन्मानित

मुंबई - मुंबई मराठी पत्रकार संघाकडून ( Mumbai Press Association ) पत्रकार दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना गौरविण्यात आले. यामध्ये कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घर दुरुस्ती व दलितोद्धार क्षेत्रात उल्लेखनीय पत्रकारिता केल्याबद्दल 'ईटीव्ही भारत'चे पत्रकार नितीन बिनेकर ( Etv Bharat Reporter ) यांना कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्काराने सन्मानित ( Press Association Awarded Etv bharat Reporter ) केले. ज्येष्ठ सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, विश्वस्त अजय वैद्य, वैजयंती कुलकर्णी-आपटे, संघाचे उपाध्यक्ष सुधाकर काश्यप मान्यवर उपस्थित होते. "सोशल मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा वाचन संस्कृतीवर परिणाम झाल्यामुळे वृत्तपत्रे आणि पुस्तके यांच्या भवितव्याविषयी चर्चा केली जाते. मात्र, वृत्तपत्रे आणि पुस्तके यावरच माणसाची संस्कृती अवलंबून आहे. ठाम मत व्यक्त करून वाचणारी माणसे असेपर्यंत पुढील हजारो वर्ष वृत्तपत्रे आणि पुस्तके टिकून राहतील," असा विश्वास राज्य शासनाच्या जलसंधारण आणि रोजगार हमी योजनेचे सचिव आणि ज्येष्ठ गझलकार दिलीप पांढरपट्टे यांनी व्यक्त केला.

मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी कोरोनामुळे वृत्तपत्रांमधील नोकरकपात, पत्रकारांची वेतन कपात परिणामी पत्रकार आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांवर ओढवलेले संकट याबाबात यावेळी बोलताना चिंता व्यक्त केली.

पुरस्कार मिळालेले पत्रकार -

  • आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील लिखाणासाठी - देवेंद्र कोल्हटकर (झी 24 तास)
  • जयहिंद प्रकाशन पुरस्कार : उत्कृष्ट पुस्तकासाठी 'भेदाभेद भ्रम अमंगळ' संत विचार आणि संविधानिक मूल्य - शामसुंदर सोन्नर (ज्येष्ठ पत्रकार)
  • कॉ. तु. कृ. सरमळकर पुरस्कार : कामगार, झोपडपट्टी, भाडेकरू, घर दुरुस्ती व दलितोद्धार यासाठी - नितीन बिनेकर (ईटीव्ही भारत)
  • विद्याधर गोखले ललित लेखन पुरस्कार : उत्कृष्ट ललित लिखाणासाठी - मुकेश माचकर (कार्यकारी संपादक, मार्मिक)
  • रमेश भोगटे पुरस्कार : उत्कृष्ट राजकीय बातम्या व राजकीय वृत्तांतासाठी श्री. समीर मणियार (दै. महाराष्ट्र टाईम्स)
  • 'शिवनेर'कार विश्वनाथराव वाबळे स्मृती पुरस्कार : शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट बातम्यांसाठी - सीमा महांगडे (दै. लोकमत)

    हेही वाचा - Mumbai Mayor On Corona : मुंबई डेंजर झोनच्या बाहेर, मात्र काळजी घ्या - किशोरी पेडणेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.