मुंबई - व्हिडिओकॉन आयसीआयसीआय बँकेच्या घोटाळ्यासंदर्भात आयसीआयसीआयच्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक यांना ई़डीकडून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील कार्यालयामध्ये दीपक कोचर यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
काय आहे प्रकरण -
चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर व व्हिडिओकॉन ग्रुपचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांच्यात व्यावसायिक भागीदारी होती. 2009 ते 2011 या दरम्यान व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत व चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना नियमबाह्य पद्धतीने तब्बल 1875 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आल्याचा आरोप चंदा कोचर यांच्यावर आहे.
यासंदर्भात सीबीआयकडून गुन्हा नोंदवण्यात आला असून, ईडीकडून सुद्धा तपास केला जात आहे. चंदा कोचर यांच्या विरोधात निवृत्त न्यायाधीश बीएन श्रीकृष्ण समिती चौकशीसाठी नेमण्यात आली होती समितीच्या अहवालानंतर चंदा कोचर यांच्यावर फेब्रुवारी 2019 मध्ये बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती.