ETV Bharat / city

प्रदीप शर्मा शिवसेनेत, पोलीस खात्यात चकमक दाखवल्यानंतर राजकारणात चमकणार? - प्रदीप शर्मांबद्दल माहिती

प्रदीप शर्मा यांच्यासोबत नालासोपारा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शर्मा हे नालासोपारा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरू आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रदीप शर्मा यांना शिवबंधन बांधताना
author img

By

Published : Sep 13, 2019, 8:42 PM IST

Updated : Sep 13, 2019, 9:27 PM IST

मुंबई - पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमक फेम प्रदीप शर्मा यांनी आज (शुक्रवारी) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शर्मांनी हातावर शिवबंधन बांधले.

प्रदीप शर्मांचा शिवसेना पक्ष प्रवेश

आरपीआयनंतर शिवसेनेत येऊन शर्मा यांनी आपल्या राजकीय करिअरला पुन्हा नवीन सुरुवात केली आहे. शर्मा यांच्यासोबत नालासोपारा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शर्मा हे नालासोपारा विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - ठरलं..! उदयनराजेंच्या हाती 'कमळ', मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत उद्या भाजपप्रवेश

प्रदीप शर्मांबद्दल-

प्रदीप शर्मा हे मुंबईतील एक पोलीस निरीक्षक होते. ते चकमक फेम म्हणून प्रसिद्ध होते. 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झालेले शर्मा यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली. 1990च्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते, तेव्हा शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून, नगरमधून प्रारंभ

शर्मा यांचा जवळपास 312 चकमकींमध्ये सहभाग होता. त्यांनी आजवर शंभरहून अधिक गुंडांचा एन्काऊंटरमध्ये खात्मा केला आहे. त्यात लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता. लखनभैया बनावट चकमक प्रकरणी त्यांच्यावर 2008 साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

हेही वाचा - कोकणात राष्ट्रवादीला धक्का, भास्कर जाधवांनी 'घड्याळ' काढत बांधले 'शिवबंधन'

नोव्हेंबर 2006 मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील 13 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात शर्माही होते. 2013 मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले.

शर्मा यांचे निलंबन 9 वर्षांनी, 24 ऑगस्ट 2017 संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले. मात्र, त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्मा यांनी 4 जुलै 2019 रोजी तडकाफडकी राजीनामा दिला. अशा या शर्मांनी आता राजकारणात एन्ट्री घेतली आहे. ते शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलीस खात्यात आपली चकमक दाखवल्यानंतर शर्मा राजकारणात किती चमकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:इनकाउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा शिवसेनेत

पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले चकमकफेम प्रदीप शर्मा आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रदीप शर्मा हातावर शिवबंधन बांधले आरपीआय नंतर शिवसेनेत येऊन शर्मा यांनी आपल्या राजकीय करिअरला पुन्हा नवीन सुरुवात करत आहेत. शर्मा यांचा सोबत नालासोपारा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.शर्मा यांची नालासोपारा विधानसभा क्षेत्रातून चर्चा आहे.

प्रदीप शर्मा यांच्याबद्दल जाणून घ्या

प्रदीप शर्मा हे मुंबईतील एक पोलीस निरीक्षक आहेत. ते चकमकफेम म्हणून प्रसिद्ध आहेत. १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झालेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची कारकीर्द नेहमीच वादात राहिली. एकोणीसशे नव्वदच्या दशकात जेव्हा गुन्हेगारी टोळ्यांचे प्रमाण वाढले होते तेव्हा चकमकफेम प्रदीप शर्मा यांनी अनेक गुन्हेगारांना संपवले.

शर्मा यांचा जवळपास ३१२ चकमकींमध्ये सहभाग होता. त्यांनी आजवर शंभरहून अधिक गुंडांचा एनकाऊंटरमध्ये खात्मा केला आहे, त्यांत लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसह आंतरराष्ट्रीय गुन्हेविश्वातील गुंडांचा समावेश आहे. प्रदीप शर्मा यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी काम करत असल्याचा आरोप होता. लखनभैया बनावट चकमक प्रकरणी त्यांच्यावर २००८ साली निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

नोव्हेंबर २००६ मधील लखनभैया चकमक बनावट असल्याचे तपासात समोर आल्यानंतर मुंबई पोलीस दलातील १३ कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्माही होते. २०१३ मध्ये मुंबईतील न्यायालयाने त्यांना आरोपमुक्त केले होते.

प्रदीप शर्मा यांचे निलंबन नऊ वर्षांनी, २४ ऑगस्ट २०१७ रोजी संपले आणि त्यांना त्याच दिवशी ठाणे गुन्हे शाखेतील खंडणीविरोधी पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्त केले. मात्र त्यानंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै २०१९ रोजी तडकाफडकी राजीनामा दिला.

अशा या शर्मानी आता राजकारणात इन्ट्री घेतली आहे शिवसेनकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता पण मतदारसंघ कोणता याबबद्दल लवकरच येणाऱ्या निवडणूकी आधी कळेल .आता पोलीस खात्यात आपली चकमक दाखवल्या नंतर शर्मा राजकरणात किती चकमक दाखवतात हे पाहणं योग्य ठरेल.Body:व्हिज्युअल मोजोConclusion:.
Last Updated : Sep 13, 2019, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.