ETV Bharat / city

Winter session 2021 : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने होणार? - विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी होणार

मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session 2021) पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक (speaker election process) आवाजी मतदानाने होण्याची शक्यता आहे.

maharashtra assembly Speaker news
maharashtra assembly Speaker news
author img

By

Published : Dec 3, 2021, 3:29 PM IST

मुंबई - मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session 2021) पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक (speaker election process) आवाजी मतदानाने होण्याची शक्यता आहे. पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी, यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली होती.

22 ते 28 डिसेंबरला दरम्यान होणार हिवाळी अधिवेशन -

विधानसभा अध्यक्षाची निवडणूक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात व्हावी. यासाठी काँग्रेस (Congess Insistent For speaker post election) आग्रही आहे. 22 ते 28 डिसेंबरला मुंबई हिवाळी अधिवेशन होणार असून पहिल्या आठवड्यात 22, 23 आणि 24 डिसेंबर रोजी कामकाज चालणार आहे. तर दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर या दोन दिवस कामकाज चालणार आहे. या पहिल्याच आठवड्यात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. गुप्त मतदान पद्धतीने विधानसभा अध्यक्षची निवड केली असती तर, महाविकास आघाडी सरकारला दगाफटका होण्याची भीती होती. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड आवाजी व्हावी, यासाठी या आधीपासून महाविकास आघाडी सरकार आग्रही होते.

विधानसभा अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून तीन नावे चर्चेत -

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक हिवाळी अधिवेशनात व्हावी, यासाठी काँग्रेसने आग्रही भूमिका घेतली होती. काल 2 डिसेंबर रोजी याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे मंत्री तसेच प्रदेशाध्यक्ष आणि इतर महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या सर्वांकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक अधिवेशनात पार पाडावी, अशी आग्रही भूमिका घेतली असून सध्या काँग्रेसकडून अधिकृतपणे अध्यक्ष पदाबाबत कोणाचेही नाव जाहीर झाले नाही. मात्र, विधानसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार अमिन पटेल आणि संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून मिळत आहे.

हेही वाचा - Winter Session 2021 : सलग दुसऱ्या वर्षी नागपूर करार मोडला, जाणून घ्या... नागपूर कराराबद्दल!

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.