ETV Bharat / city

Eknath Shinde Slammed to Udhav Thackeray : राष्ट्रवादीच्या जंजीरमध्ये जे अडकलेत त्यांनी खंजीरची भाषा करू नये : एकनाथ शिंदे - शिवसेनेत उभी फूट

राज्यात शिवसेनेच्या आमदारांनी बंड ( Rebel MLA ) केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट ( Vertical split in Shiv Sena ) पडली. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी सातत्याने बंडखोर आमदारांवर कठोर टीका केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी ( Trapped in Chains of NCP ) खंजीरची भाषा ( Not Speak Language of Daggers ) वापरू नये, असा पलटवार ( Eknath Shinde Slap ) केला आहे. तसेच, वेळ आल्यावर खंजीर कोणी खुपसला हेसुद्धा सांगणार, असा सूचक इशारा दिला आहे.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Jul 25, 2022, 10:09 AM IST

मुंबई : मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप शिंदे गटावर केला जातो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपाला सडेतोड उत्तर ( Eknath Shinde Slap ) दिले. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेल्यांनी ( Trapped in Chains of NCP ) खंजीरची भाषा करू नये, ( Not Speak Language of Daggers ) असा वर्मी घावच शिंदे यांनी घातला आहे. तसेच पाठीत खंजीर कोणी खुपसला हे योग्य वेळ आल्यावर मी सांगेन, असा सूचक इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांना दिला आहे. यातून शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. शिंदे यांनी बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि शिंदे गट असा वाद यामुळे रंगला आहे. तर दुसरीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावरून शिंदे गटावर चौफेर टीका केली.

बाळासाहेबांचे नाव, फोटो लावू नका : शिंदे गट बंडखोर नाहीत हरामखोर आहेत. शिवसेना त्यांना संपवायची आहे. ठाकरे आणि शिवसेना हे नाते तोडायचे आहे. परंतु, तुमच्यात हिम्मत असेल, तर शिवसेना प्रमुखांचा, माझ्या वडिलांचा फोटो लावू नका. तुमच्या हिमतीवर मत मिळवा, प्रत्येकाला आई-वडील प्यारे असतात. जे फुटून गेलेले आहेत, सुदैवाने त्यांचे आई-वडील सोबत आहेत. त्यांनी त्यांना सोबत घेऊन सभा घ्यावी आणि मते मागावीत, असा हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही वारसदार : बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा कोणी केली, हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यांचे विचार घेऊन आम्ही चाललो आहोत. महाराष्ट्राच्या जनतेनेही ते स्वीकारले आहे. राज्यभरातून जिल्हा जिल्ह्यातून आम्हाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे.

एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा : बाळासाहेब आमचे कुटुंब प्रमुख होते, आम्हाला वडिलांप्रमाणे होते. त्यांच्या आशीर्वादाने जे सरकार स्थापन झाले आहे. जे अडीच वर्षांपूर्वी झाले नाही, ती चूक दुरुस्त करीत आहोत. निवडणुकापूर्वी शिवसेना आणि भाजप युती होती. तीच पुढे नेण्याचे प्रयत्न करतोय. सारखं खंजीर खुपसल्याची भाषा केली जाते. त्यावर मी बोलू शकतो, जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जंजीरमध्ये अडकलेत त्यांनी खंजीरची भाषा करू नये. पाठीत खंजीर कोणी खुपसला हे मी योग्य वेळ आली की सांगेन, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.

हेही वाचा : Arpita Mukherjee Car Accident : अर्पिता मुखर्जींच्या ताफ्याला कारची धडक, अपघातात किरकोळ जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.