ETV Bharat / city

CM Eknath Shinde : मोदींनी बरीच साफसफाई केली, राज्यातही बरीच साफसफाई बाकी - मुख्यमंत्री - Eknath Shinde

स्वच्छता अभियान २ची सुरुवात ( Start of cleanliness drive ) आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर ( YB Chavan Centre Mumbai ) येथे करण्यात आली.

Chief Minister Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Sep 30, 2022, 2:29 PM IST

मुंबई - स्वच्छता अभियान २ची सुरुवात ( Start of cleanliness drive ) आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर ( YB Chavan Centre Mumbai ) येथे करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमांमध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ( Eknath Shinde ) त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांनी या कार्यक्रमाबद्दल माहिती देत स्वच्छतेबाबत राज्याने काय करायला हवे असे सांगत, आतापर्यंत यामध्ये आपण मागे कसे राहिलो हे सांगत असताना मागच्या महाविकास आघाडी सरकार ( Maha Vikas Aghadi Govt ) विशेष करून मुंबई महानगरपालिकेवर ( Mumbai Municipal Corporation ) सत्तेत असलेल्या शिवसेनेवर ( Criticism of Shiv Sena ) हल्लाबोल केला आहे.

९० दिवसात मुंबई खड्डे मुक्त करणार! याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत असलेल्या खड्ड्यांमुळे नाहक मुंबई व त्याचबरोबर सरकारची बदनामी होत आहे. परंतु यासाठी आता नवीन प्लॅनिंग तयार केले गेले असून ९० दिवसात मुंबईतील सर्व खड्डे ( Mumbai pothole free ) भरले जातील असा आशावाद त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. वास्तविक दरवर्षी थोड्या थोड्या रस्त्यांचं काँक्रीटीकरण होत असल्याचं आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सांगितल्यावर यंदा ४५० किलोमीटर रस्त्यांचं पूर्ण कॉंक्रिटीकरण केलं जाईल, असेही ते म्हणाले. यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च येणार असून सर्व रस्त्यांचं मार्चपर्यंत काँक्रिटीकरण केले जाईल असेही ते म्हणाले. तसेच दोन वर्षाने रस्त्यात खड्डा दिसणार नाही असं सांगत, सरकारची मानसिकता लोकांना न्याय द्यायची असते. हे काम सोपं होतं, परंतु हे काम अगोदर झालं नाही. कदाचित हे काम आमच्या हातून होणार होतं, म्हणूनच आम्ही सरकारमध्ये आलो असं हे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर बोचरी ( Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray ) टीका केली आहे.

बरीच साफसफाई बाकी आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी २०१४ मध्ये स्वच्छते मोहिमेसाठी स्वतः झाडू हातात घेतला. २०१५ ला स्वच्छ भारत अभियानची घोषणा ( Swachh Bharat Mission ) केली. काही लोकांना वाटलं हा एक इव्हेंट आहे. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरीच साफसफाई केली आहे, पण राज्यातही बरीच साफसफाई करायची बाकी आहे, असं सांगत शिवसेनेला पुन्हा एकदा टोमणा लगावला आहे. आम्ही चांगले कार्यक्रम करू शकतो हे सर्वांना माहीत आहे. तसेच आता हे काम करायचं आहे. लोकांच जीवनमान उंचावेल असे काम करून एक चांगला संदेश द्यायचा आहे. नवी मुंबईत आयुक्त अभिजीत बांगर यांनी चांगलं काम केल्याने त्यांना आता ठाण्यात चांगली साफसफाई करण्यासाठी आणल आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

टक्केवारीसाठी प्रकल्प रखडवले तर खपवून घेणार नाही - याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की, स्वच्छता अभियान २ याची सुरुवात आज झाली आहे. साडेबारा हजार कोटी रुपयांचा प्लान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केला असून यामध्ये टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे. तसेच या अगोदर केवळ टक्केवारीसाठी प्रकल्प रखडले किंवा ते अडकवून ठेवले गेले. परंतु यापुढे हे खपवून घेणार नाही असा सज्जड दम त्यांनी लोकप्रतिनिधी, तसेच अधिकाऱ्यांना दिला आहे. मागच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टेंडरिंग झालं, त्यामुळे प्रकल्प वेगाने पूर्ण होऊ शकले नाहीत. परंतु आत्ता राज्यात विकास होणार असून जर अशा पद्धतीने टक्केवारीसाठी कोणी प्रकल्प रखडवले किंवा ते अडकवून ठेवले तर त्याची थेट तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करा असा आव्हानही त्यांनी केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.