मुंबई- एकनाथ शिंदे गट ( Eknath Shinde Group ) आणि शिवसेनेमध्ये शह-काटशहचे राजकारण सुरू झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने आज शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय बंद केले. एकनाथ शिंदे गटाकडून विधिमंडळ सचिवांना याबाबतचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर विधान भवनात दुसऱ्या मजल्यावर असलेले शिवसेनेचे विधिमंडळ पक्ष कार्यालय बंद करण्यात आले आहे. शिवसेनेचे पक्ष कार्यालय बंद करून मूळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाने धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
दोन्ही गट समोरासमोर - विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडीपासूनच ( Maharashtra Assemble Election ) शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमध्ये संघर्ष होत दिसत असल्याचे दिसू लागले आहे. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. मात्र, तो व्हीप आम्हाला लागू होत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे आज सुरू झालेल्या विशेष अधिवेशनात शिवसेनेचे दोन्ही गट समोरासमोर आले आहेत. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विधी मंडळ कार्यालय बंद करून शिवसेनेला धक्का देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
हेही वाचा - Maha Assembly Speaker Election : महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लढवणारे राजन साळवी आहेत कोण?
एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी व्हीप नाकारला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांची उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे नेते पदावरून हकालपट्टी केली. तसेच या आधी विधानसभेत गटनेतेपदी एकनाथ शिंदे ऐवजी अजय चौधरी यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, एकनाथ शिंदे गटाकडे शिवसेनेचे 39 आमदार आहेत. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आज झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने जारी केलेला व्हीप एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी धुडकावून लावला.
"शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षात फूट पडली" - भारतीय संविधानाच्या 10 व्या शेड्युलनुसार हे आवश्यक आहे की एखाद्या पक्षात उभी फूट पडली आहे. तरच त्या संदर्भात विचार केला जाऊ शकतो की, म्हणजे ग्रामपंचायती पासून, जिल्हा परिषद आमदार, खासदार आणि संघटना पातळीवर फूट पडली पाहिजे. मगच ती फूट म्हटली जाते. पण, सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेत विधिमंडळ पक्षात फूट पडलेली आपण पाहतो, असेही कायद्याचे अभ्यासक अॅड. असीम सरोदे यांनी म्हटलं आहे.
व्हिप म्हणजे काय? एखाद्या पक्षाने कोणत्या मुद्द्यावर सभागृहामध्ये भूमिका घ्यायची याबद्दल घेतलेला निर्णय म्हणजेच व्हिप होय. संसदीय लोकशाहीत पक्षातर्फे प्रतिनिधिंना व्हिप जारी केला जातो.पक्षाचा आदेश सर्व आमदारांना बंधनकारक असतो. हा व्हीप राजकीय पक्षाचा अधिकार असतो. विधिमंडळात आमदारांना पक्षादेश पाळणे हाच व्हीपचा मुख्य हेतू असतो. विधानसभेत महत्त्वाच्या विषयावर मतदानासाठी संबंधित पक्षाने कोणाला मतदान करायचे याचा निर्णय घ्याचा असेल, तर याबाबद पक्षादेश व्हीपमार्फत जारी करण्यात येतो. तसेच पक्षाच्या सर्व आमदारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पक्ष असे वेळेवेळी व्हीप जारी करतात.
हेही वाचा-हेही वाचा-Two NCP office bearers arrested : बंडखोर आमदार वास्तव्यास राहिलेल्या हॉटेलमध्ये तोतयागिरी? राष्ट्रवादीच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक
हेही वाचा-हेही वाचा-Assembly Speaker Election 2022 : विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी!