ETV Bharat / city

Shinde Fadnavis New Government : उर्वरित आमदार उद्या मुंबईत येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra New government formation
महाराष्ट्रात नवे सरकार
author img

By

Published : Jul 1, 2022, 6:33 AM IST

Updated : Jul 1, 2022, 4:13 PM IST

16:10 July 01

13:32 July 01

माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना भवनात दाखल आहेत. यांच्यासोबत अनिल देसाई, अनिल परब, सुभाष देसाई हे शिवसेनेचे पहिल्या फळेतील नेतेदेखील उपस्थित आहे. उद्धव ठाकरे यांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडते वेळेस सांगितलं होते, मी यापुढे पक्ष वाढीसाठी रोज सेना भावनात जाणार आणि पक्ष वाढीचे काम करणार आहे.

12:13 July 01

विधानसभेचे अधिवेशन एक दिवस पुढे ढकलले..

महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवारी ३ जुलै आणि सोमवारी ४ जुलै २०२२ रोजी बोलावण्यात आले आहे. या
अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक २ जुलै, २०२२ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.

11:12 July 01

शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

महाराष्ट्र विधानसभेतील बंडखोर शिवसेना आमदारांचे निलंबन आणि त्यांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत त्यांना सभागृहात प्रवेश करण्यापासून किंवा कामकाजात भाग घेण्यापासून रोखण्याकरिता आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासह इतर याचिकांसह सर्वोच्च न्यायालय 11 जुलै रोजी सुनावणी घेणार आहे. शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

10:38 July 01

भाजप आमदारांची आज संध्याकाळी बैठक होणार

उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी भाजप आमदारांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे. बैठकीत उमेदवाराचे नाव निश्चित होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

10:10 July 01

आम्ही सरकारला त्रास देणार नाही- संजय राऊत

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी या सरकारचे अभिनंदन करतो. मी त्यांचे स्वागत करतो. उद्धव ठाकरेंचे सरकार आले की त्यांना त्रास देऊ, असे पहिल्या दिवसापासून ते सांगत होते. पण आम्ही ते करणार नाही. आम्ही या सरकारला त्रास देणार नाही, त्यांनी जनतेसाठी काम केले पाहिजे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

08:30 July 01

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह आज गोव्यातून मुंबईत परतणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी रात्री गोव्यात पोहोचले आहेत. ते आज समर्थक आमदारांसह मुंबईत परतणार असल्याचे सूत्राने सांगितले.

07:29 July 01

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उशीरा रात्री पोहोचले गोव्यात, बंडखोर आमदारांसह मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून जंगी स्वागत

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी रात्री उशीरा गोवा येथील ताज हॉटेलमध्ये पोहोचले. यावेळी शिवसेना आणि सहयोगी आमदारांच्यावतीने त्यांचे गोव्यात जंगी स्वागत करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तर शिवसेनेच्या महिला आमदारांनी त्यांना ओवाळून त्यांचे स्वागत केलं. यावेळी आमदारांनी आपल्या हस्ते पेढा भरवत त्यांचे तोंड गोड केले.

06:36 July 01

शिंदे फडणवीस सरकारकडून आरे वसाहतीत मेट्रो कारशेड बांधण्यात येणार

सत्तेवर येताच शिंदे फडणवीस सरकारकडून भाजप सत्तेत असतानाची धोरणे राबविण्यात येणार आहेत. त्याचाच भाग म्हणून नवीन सरकार आरे वसाहतीत मेट्रो कारशेड बांधण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.

06:16 July 01

Shinde Fadnavis New Government : माझ्यावरील राग मुंबईवर काढू नका- उद्धव ठाकरे

मुंबई - मागील काही दिवसांपासून सुरु असलेली राजकीय घडामोड अखेर आज संपली आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपीनीयतेची शपथ घेतली ( Eknath Shinde Oath Maharashtra Chief Minister ) आहे. तर, मुख्यमंत्रीपदासाठी आधी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अचानक आता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ( Devendra Fadnavis Oath DCM ) आहे.

एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, मी सत्तेबाहेर असेल, पण सरकार चालावे ही माझी जबाबदारी असेल, असं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होते. परंतु, केंद्रीय पातळीवर काही सूत्रे हलली आणि भाजपध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असा आग्रह केला. त्यानंतर पक्षाचा आदेश मानत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ( Devendra Fadnavis Oath Deputy CM ) आहे.

हेही वाचा-Devendra Fadnavis Deputy CM : ते पुन्हा आले पण, उपमुख्यमंत्री म्हणून; राज्यपालांकडून देवेंद्र फडणवीसांनी घेतली शपथ

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 'शिंदे सरकार'बाबत आता आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांची अपेक्षा ही उपमुख्यमंत्री पदाच्या पुढची नव्हती. पण, दिल्ली किंवा नागपूर येथून आदेश आला आणि हा आदेश अखेरचा असल्याने शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. माझ्या मते त्यांना देखील त्याची बहुतेक कल्पना नव्हती की ते मुख्यमंत्री होणार आहे, असं पवार ( Sharad Pawar ) यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा-Sharad Pawar : 'देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी हा आश्चर्याचा धक्का, पण...'

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर मंत्रालयात जाऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला ( Eknath Shinde Take Charge Chief Minister ) आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या विकासकामांबाबत भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातली प्रलंबित प्रश्न पुढे घेऊन जाणार आहे. रखडलेल्या प्रकल्पांना वेग देणार आहे. माजी मुख्यमंत्री सोबत असल्याने जोरदार बॅटिंग होईल. राज्याचा विकास हेचं आमचं उद्दिष्ठ असणार आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्यासोबत यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते.

हेही वाचा-Eknath Shinde Oath Ceremony Live Updates : एकनाथ शिंदे सरकारचे पहिले विधानसभेचे विशेष अधिवेशन 2 आणि 3 जुलै रोजी

सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे ३० वे मुख्यमंत्री बनले आहेत. त्यांच्या रूपाने साताऱ्याचा चौथा सुपुत्र मुख्यमंत्री पदावर विराजमान झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे. ( CM Eknath Shinde Son of Satara District )महाबळेश्वर हा डोंगरी आणि दुर्गम तालुका. कोयना धरण, अभयारण्यामुळे विस्थापित व्हावे लागल्याने कामधंद्यासाठी लोकांना मुंबईची वाट धरावी लागायची. एकनाथ शिंदे यांचे कुटुंबीय देखील कामधंद्यासाठी ठाण्याला गेले आणि स्थायिक झाले. ९ फेब्रुवारी १९६४ रोजी एकनाथ शिंदे यांचा ठाणे येथे जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. २३ येथे, तर माध्यमिक शिक्षण मंगला हायस्कूलमध्ये झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात प्रवेश केला होता.

हेही वाचा-CM Eknath Shinde : साताऱ्यात जल्लोष; एकनाथ शिंदेंच्या रूपाने चौथा सुपूत्र बनला राज्याचा मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. फडणवीस आणि शिंदे यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले. दहा दिवसांपासून हा सत्तासंघर्ष सुरू होता. शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राजीनामा दिला. त्यानंतर आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील अशीच शक्यता वर्तवण्यात येत असताना ही घोषना झाली. अनेक कारणासाठी शिंदेच्या रुपाने भाजपला ब्रम्हास्त्र मिळाले आहे.

हेही वाचा-CM Eknath Shinde Oath Video : एकनाथ शिंदे यांनी शपथविधीपूर्वी केले बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे स्मरण

Last Updated : Jul 1, 2022, 4:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.