ETV Bharat / city

Ganeshotsav 2022: बाप्पाच्या दर्शनाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अंबानींच्या घरी... पडद्याआड नेमकं काय घडतंय? - Eknath Shinde at Antilia

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची ( Ganeshotsav ) धामधूम सुरू आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने मोठ्या थाटात गणरायाचे स्वागत केले आहे. लाडक्या गणपती बाप्पाचे रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणरायाची स्थापना ( Establishment of Ganaraya at the residence of Antilia ) करण्यात आली आहे. गुरुवारी अंबानीच्या घरातल्या बाप्पांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले दर्शन.

Shinde Fadnavis Met Mukesh Ambani
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अंबानींच्या घरी
author img

By

Published : Sep 2, 2022, 5:09 PM IST

मुंबई - गुरुवारी, गणेश उत्सवाच्या ( Ganeshotsav ) दुसऱ्या दिवशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ( Deputy CM Devendra Fadnavis ) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी ( Famous industrialist Mukesh Ambani ) यांचे निवासस्थान अँटिलिया येथे पोहोचले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस होत्या. सामान्य गणेशभक्तांप्रमाणेच मुकेश अंबानी यांनीही आपल्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती बसवली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गेले. मुकेश अंबानींच्या घरातून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दुपारी 4.10 वाजता बाहेर पडले. राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघेही थेट एका उद्योगपतीच्या घरी गेल्याने पडद्याआड काही हालचाली सुरू असल्याच्या चर्चा आता सुरू आहेत.

असे पहिलेच मुख्यमंत्री - यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक हेमंत देसाई ( Political analyst Hemant Desai ) सांगतात की, "धीरूभाई अंबानी, अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांच्यापैकी कोणीही असो अंबानी यांच्या घरी वर्षानुवर्षे गणपती बसवला जात होता. पण, राज्यात कुठल्याही पक्षाचा सरकार असो कोणीही मुख्यमंत्री असो आत्तापर्यंत एकही मुख्यमंत्री या अंबानी कुटुंबीयांच्या घरी गणपती निमित्त गेल्याचं मला आठवत नाही. एवढेच काय कुठल्याही उद्योगपतीच्या घरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेल्याच माझ्या पाहण्यात नाही. साधारणपणे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उद्योगपती येतात." असं हेमंत देसाई यांनी सांगितले.

BMC च्या दृष्टीने महत्वाचे - पुढे हेमंत देसाई सांगतात की, "हे झालं आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांबद्दल. पण, आगामी मुंबई महानगरपालिकांच्या दृष्टीने देखील हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, आता भाजपला काहीही करून बृहन्मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता आणायची आहे आणि ज्याप्रमाणे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सर्वात मोठे बजेट असते. त्याचप्रमाणे पालिकेच्या अनेक अंतर्गत उपक्रमांमध्ये हे मोठे उद्योग समूह उद्योगपती जोडले गेलेले असतात. महानगरपालिकेतील अनेक काम या उद्योगपतींची जोडली गेलेली असतात. तसे अंबानी कुटुंबाचे संबंध सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी आणि मुख्यमंत्र्यांची चांगले आहेत. पण एकनाथ शिंदे असो की देवेंद्र फडणवीस ही जवळीक खूपच अग्रेसिव्हली दाखवून देतात."

आम्ही तुमच्या पावलावर चालतोय - देसाई सांगतात की, "आपल्या देशात याआधी व्यापारी असो की उद्योगपती यांच्याकडे एका व्हाइट कॉलर चोराच्या नजरेने पाहिले जायचे. हे सगळे चोर असतात असा एक समज होता. मात्र, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेळोवेळी व्यापारी आणि उद्योगपती हे चोर नाहीत त्यांच्याकडे चोराच्या नजरेने पाहू नका. असे आवाहन जनतेला करताना दिसतात. आणि आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अंबानींची भेट घेत आम्ही देखील तुमच्याच पावलावर पाऊल टाकत आहोत. आमचे देखील त्यांच्याशी चांगले संबंध आहेत हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे." असे देसाई सांगतात.

अंबानी धमकी प्रकरणामुळे आणखी महत्व - पुढे बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हंटले की, "एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अंबानी भेटीमध्ये एक सिम्बॉल असा देखील आहे की, ज्यावेळी अंबानींच्या बंगल्याबाहेर जी काही स्फोटकांची गाडी सापडली होती आणि एकूणच त्यांच्या जीवाला जो काही थ्रेट होता या सर्वानंतर हे सर्व आम्ही गांभीर्याने घेतोय आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दाखवण्याचा देखील हा एक प्रयत्न आहे. या स्फोटकांच्या प्रकरणामुळेच या भेटीला एक वेगळी मिती देखील आलेली आहे. यात आणखी एक मुद्दा म्हणजे याकडे एका ऑफिशियल भेटीपेक्षा व्यक्तिगत भेट म्हणून बघितलेले चांगले आणि हा त्याचाच प्रयत्न आहे. पर्सनल रिलेशन चांगले ठेवणे. सोबतच आम्ही तुमची काळजी घेणार आहोत आणि घेतोय हे देखील दाखवण्याचा यामागे प्रयत्न दिसतो." असे मत ज्येष्ठ पत्रकार व विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा : Aditya Thackeray criticizes इतर कोणाच्या नाही तर, बाप्पाच्या आशीर्वादामुळे कोरोनाचे सावट सरले; आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.