ETV Bharat / city

'दिवाळीपूर्वी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना जास्तीत जास्त दिलासा देण्याचा प्रयत्न' - pmc bank news

वायकर यांनी सोमवारी आरबीआयचे बीकेसी येथील कार्यालयात महाव्यवस्थापिका उमा शंकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एवढा मोठा घोटाळा होत असताना आरबीआयच्या तसेच बँकेचे ऑडीट करणार्‍या ऑडीटरच्या लक्षात कसे नाही आले? आरबीआय प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करेलच, परंतु तोपर्यंत खातेधारकांना त्याचा त्रास का?, असे प्रश्‍न आमदार रवींद्र वायकर यांनी उपस्थित केले.

पीएमसी
author img

By

Published : Oct 8, 2019, 3:00 PM IST

मुंबई - पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेतील (पीएमसी) खातेदारकांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्न करत असून खातेधारकांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्याच्या मर्यादेत वेळोवेळी वाढ करण्यात येईल, असे आश्‍वासन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) महाव्यस्थापिका उमा शंकर यांनी आमदार रवींद्र वायकर यांना दिले. त्याचबरोबर पीएमसी बँकेला अन्य कुठलीही बँक समाविष्ट करण्यास तयार असेल तर त्याचा आरबीआय निश्‍चित विचार करेल, असेही उमा शंकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - राजकीय वारसा लाभलेले 'हे' चेहरे पहिल्यांदाच विधानसभेच्या रणांगणात!

पीएमसी बँकेतील घोटाळ्याप्रश्‍नी आरबीआयने संचालक मंडळ बरखास्त केले असून त्यावर प्रशासक बसवला आहे. त्यातच या बँकेतील खातेधारकांना मर्यादीतच रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. निर्णय ग्राहकांच्या हितासाठी असला तरी आरबीआयने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे खातेधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रश्‍नी जोगेश्‍वरीच्या पीएमसी बँकेतील अनेक खातेधारकांनी आमदार रवींद्र वायकरांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. याची दखल घेत आमदार रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तसेच आरबीआचे गर्व्हनर यांना पत्र देऊन याप्रकरणात तातडीने लक्ष घालून खातेधारकांना दिलासा देण्याची विनंती केली.

हेही वाचा - शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई

एवढेच नव्हे तर याप्रश्‍नी वायकर यांनी सोमवारी आरबीआयचे बीकेसी येथील कार्यालयात महाव्यवस्थापिका उमा शंकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एवढा मोठा घोटाळा होत असताना आरबीआयच्या तसेच बँकेचे ऑडीट करणार्‍या ऑडीटरच्या लक्षात कसे नाही आले? आरबीआय प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करेलच, परंतु तोपर्यंत खातेधारकांना त्याचा त्रास का?, असे प्रश्‍न आमदार रवींद्र वायकर यांनी उपस्थित केले.

यावर उमा शंकर यांनी, आरबीआय सातत्याने बँकेचे ऑडीट नव्हे तर इनस्पेक्शन करत असते. परंतु, बँकेने खरा डेटा आरबीआयला दिला नाही, तसेच पाठवला नाही. ज्यावेळी पीएमसी बँकेत घोटाळा झाल्याचे आरबीआयच्या लक्षात आल्यावर यात अधिक वाढ होऊ नये, यासाठी आरबीआयने ही पावले उचलली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. आरबीआयने बँकेवर प्रशासक नेमला असून त्यांना मदत करण्यासाठी आरबीआय अधिक माणसे देणार आहे. खातेधारकांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी आरबीआय दिवस-रात्र काम करत आहे. घोटाळ्याबाजांची मालमत्तेचे व्हॅल्युएशन करण्याचे काम आरबीआय करत आहे. दोन स्वतंत्र व्हॅल्युअर त्यांचे मुल्यांकन करत असून ते त्याचा अहवाल आरबीआयला देणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. जर कुठलीही अन्य बँक पीएमसी बँकेला समाविष्ट करण्यास तयार असेल तर त्याचा आरबीआय निश्‍चित विचार करेल, असे आश्‍वासनही उमा शंकर यांनी आमदार वायकर यांना दिले.

Intro:मुंबई -पंजाब आणि महाराष्ट्र को. ऑप. बँकेतील  (पीएमसी) खातेदारकांना दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्न करीत असून खातेदारकांना त्यांच्या खात्यातून रक्कम काढण्याच्या मर्यादेत वेळोवेळी वाढ करण्यात येईल, असे आश्‍वासन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) महाव्यस्थापिका उमा शंकर यांनी आमदार रविंद्र वायकर यांना दिले. त्याचबरोबर पीएमसी बँकेला अन्य कुठलीही बँक समाविष्ट करण्यास तयार असेल तर त्याचा आरबीआय निश्‍चित विचार करेल, असेही उमा शंकर यांनी स्पष्ट केले. Body:पीएमसी बँकेतील घोटाळ्याप्रश्‍नी आरबीआये संचालक मंडळ बरखास्त केले असून त्यावर प्रशासक बसवला आहे. त्यातच या बँकेतील खातेदारकांना मर्यादीतच रक्कम काढण्याची मुभा दिली आहे. ग्राहकांच्या हितासाठी असला तरी आरबीआयने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे खातेदारकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याप्रश्‍नी जोगेश्‍वरीच्या पीएमसी बँकेतील अनेक खातेदारकांनी आमदार रविंद्र वायकरांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. याची दखल घेत आमदार रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन तसेच आरबीआचे गर्व्हनर यांना पत्र देऊन याप्रकरणात तातडीने लक्ष घालून खातेदारकांना दिलासा देण्याची विनंती केली. 

एवढेच नव्हे तर याप्रश्‍नी वायकर यांनी सोमवारी आरबीआयचे बीकेसी येथील कार्यालयात महाव्यवस्थापिका उमा शंकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी एवढा मोठा घोटाळा होत असताना आरबीआयच्या तसेच बँकेचे ऑडीट करणार्‍या ऑडीटरच्या लक्षात कसे नाही आले? आरबीआय प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करेलच, परंतु तोपर्यंत खातेदारकांना त्याचा त्रास का?, असे प्रश्‍न आमदार रविंद्र वायकर यांनी उपस्थित केले.
यावर उमा शंकर यांनी, आरबीआय सातत्याने बँकेचे ऑडीट नव्हे तर इनस्पेक्शन करत असते. परंतु बँकेने खरा डेटा आरबीआयला दिला नाही तसेच पाठवला नाही. ज्यावेळी पीएमसी बँकेत घोटाळा झाल्याचे आरबीआयच्या लक्षात आल्यावर यात अधिक वाढ होऊ नये यासाठी आरबीआयने ही पावले उचलली आहे, असे स्पष्ट केले. आरबीआयने बँकेवर प्रशासक नेमला असून त्यांना मदत करण्यासाठी आरबीआय अधिक माणसे देणार आहे. खातेदारकांना लवकरात लवकर दिलासा देण्यासाठी आरबीआय दिवस-रात्र काम करीत आहे. घोटाळ्याबाजांची मालमत्तेचे व्हॅल्युएशन करण्याचे काम आरबीआय करीत आहे. दोन स्वतंत्र व्हॅल्युअर त्यांचे मुल्यांकन करीत असून ते त्याचा अहवाल आरबीआयला देणार आहेत. त्यानंतर कायदेशीर सल्ला घेतला जाणार आहे. जर कुठलीही अन्य बँक पीएमसी बँकेला समाविष्ट करण्यास तयार असेल तर त्याचा आरबीआय निश्‍चित विचार करेल, असे आश्‍वासनही उमा शंकर यांनी आमदार वायकर यांना दिले.  Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.