ETV Bharat / city

Arvind Sawant On ED Action : संजय राऊतांवरील ईडीची कारवाई सुडाची,भाजपशी जुळवून घेण्यासाठी दबाव - अरविंद सावंत

संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणात अनेकदा भूमिका स्पष्ट केली आहे. पत्राचाळ कुठे आहे हे देखील मला माहित नसल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तसेच लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्याशिवाय संजय राऊतांच्या पत्नीविरोधातही कारवाई ( ED Action against Sanjay Raut wife also ) केली जात असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रिय यंत्रणांवर टीका करताना म्हटले आहे.

Arvind Sawant On ED Action
अरविंद सावंत
author img

By

Published : Jul 31, 2022, 9:32 AM IST

मुंबई - ईडीने सकाळी संजय राऊत यांच्या मैत्री निवासस्थानी धाड टाकत कारवाईला सुरुवात ( ED Raid at Sanjay Raut House ) केली. शिवसेनेकडून या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सुडाच्या कारवाईचा आरोप करत केंद्रीय तपास यंत्रणांवर टीका केली ( Arvind Sawant Criticized ED ) .

भाजपशी जुळवून घेण्यासाठी दबाव - सावंत म्हणाले की, संजय राऊत यांनी पत्राचाळ प्रकरणात अनेकदा भूमिका स्पष्ट केलेले आहे. पत्राचाळ कुठे आहे हे देखील मला माहित नसल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तसेच लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्याने ते चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. अधिवेशन संपल्यानंतरची तारीख मागितली होती. यापूर्वीही दोन-तीन वेळा राऊत चौकशीला सामोरे गेले होते. चौकशीला सामोरे जात नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. मात्र महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर संजय राऊत भूमिका मांडत असतात ( Sanjay Raut takes stand on political situation ). त्यांच्या विरोधात राजकीय सूडबुद्धीने त्यामुळे कारवाई केली जात आहे. अनेकांचा त्यांच्यावर राग आहे. हा राग काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होतोय, असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. राजकीय परिस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी जुळवून घ्यावे, यासाठी दबाव टाकला जात असल्याचे सावंत म्हणाले ( pressure to align with bjp ).

राऊतांच्या पत्नीविरोधातही असेच आरोप - संजय राऊत यांनी कोणतीही माहिती लपवली नाही. निवडणूक आयोगाच्या शपथपत्रात ही त्यांनी माहिती नमूद केली आहे. पत्नी विरोधातही अशाच प्रकारचा आरोप केला होता ( ED Action against Sanjay Raut wife also ) . त्याही या चौकशीला सामोरे गेल्या. मात्र सध्याच्या राजकीय स्थिती वरती संजय राऊत आक्रमकपणे भूमिका मांडत असल्याने त्यांच्यावरती सूडबुडीची कारवाई सुरू असल्याचे सावंत म्हणाले.

हेही वाचा - ED Raid at Sanjay Raut : संजय राऊत यांच्या घरावर ईडीचा छापा, अटक होण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.