ETV Bharat / city

आमदार प्रताप सरनाईक व विहंग सरनाईक या दोघांना ईडीचे समन्स - ED summons MLA Pratap Saranaik

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यांचा मुलगा सरनाईक यांनाही ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून गुरुवारपर्यंत आमदार प्रताप सरनाईक व विहंग हे दोघे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याची शक्यता आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीचे समन्स
आमदार प्रताप सरनाईक व विहंग सरनाईक या दोघांना ईडीचे समन्स
author img

By

Published : Dec 1, 2020, 2:22 PM IST

मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे. त्यांचा मुलगा सरनाईक यांनाही ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले असून गुरुवारपर्यंत आमदार प्रताप सरनाईक व विहंग हे दोघे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - पुढील आठवड्यात एकत्र चौकशीला बोलवा, ईडी अधिकाऱ्यांना प्रताप सरनाईकांची विनंती

विहंग सरनाईकला दिले होते 3 वेळा समन्स

या अगोदर केलेल्या कारवाईदरम्यान प्रताप सरनाईक यांच्या मुंबई व ठाण्यातील घर, कार्यालयावर छापेमारी करण्यात आलेली होती. ही छापेमारी ईडीच्या दिल्लीतल्या पथकाने केली होती. त्यानंतर ईडी कडून विहंग सरनाईक यांना पाच तास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर 3 वेळा विहंग यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र आजारी असल्याचे कारण देत विहंग याने चौकशीसाठी हजेरी लावली नव्हती. तर, दुसरीकडे आमदार प्रताप सरनाईक शहराबाहेर असल्यामुळे ज्यावेळी ते मुंबईत आले होते, तेव्हा त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे सांगितले जात होते. मंगळवारी आमदार प्रताप सरनाईक यांची क्वारंटाईनची मुदत संपत असून यानंतर त्यांना ईडी चौकशीला सामोरे जावे लागेल.

दरम्यान, टॉप सिक्युरिटी ग्रुपचा मालकही अमित चंदोले याला ईडीकडून अटक करण्यात आली होती. एमएमआरडीएला 175 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याला ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आलेली आहे.

हेही वाचा - 'टॉप सिक्युरिटी'मधील अधिकाऱ्याला ईडीकडून अटक; प्रताप सरनाईकांचे आहेत निकटवर्तीय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.