ETV Bharat / city

ED Summoned To Sanjay Pandey : पोलीस आयुक्त पदावरून बाजूला होताच संजय पांडेंना धक्का; ईडीकडून समन्स - Shivsena Chief Uddhav Thackeray

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shivsena Chief Uddhav Thackeray ) यांंचे निकटवर्तीय असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ( Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) चौकशीसाठी नोटीस जारी केली आहे. 5 जुलै रोजी त्यांना चौकशीकरीता हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. सेवानिवृत्त होताच त्यांच्यामागे इडीचे शुक्लकाष्ठ लागले आहे.

Sanjay Pandey
Sanjay Pandey
author img

By

Published : Jul 3, 2022, 6:54 PM IST

Updated : Jul 3, 2022, 7:22 PM IST

मुंबई - वादग्रस्त कारकीर्द राहिलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे ( Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांच्यामागे आता अंमलबजावणी संचालनालयाचा ( ED ) ससेमिरा लागला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shivsena Chief Uddhav Thackeray ) यांंचे संजय पांडे हे निकटवर्तीय असल्याचे म्हटले जाते. पांडे यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी 5 जुलै रोजी हजर राहण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. 2 जुलै रोजीच त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या 3 दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

संजय पांडे ज्यावेळी डीजी होते तेव्हा त्यांनी परमबीर सिंह यांना अनिल देशमुख यांच्याविरोधात माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला होता. तसेच एनएसई सर्वर कंप्रमाइज केस प्रकरणात त्यांना समन्स बजावण्यात आले आहे. चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती. ही कंपनी संजय पांडे यांची होती. या दोन्ही प्रकरणी संजय पांडे यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकणात संजय पांडे यांच्यावर ईडी कारवाई करू शकते, असे म्हटले जाते.

निवृत्त होताच ईडीचा ससेमिरा - मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन नुकतंच निवृत्त झालेले आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्या पाठिमागे आता ईडीचा ससेमिरा लागला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नव्हे तर दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार संजय पांडे यांना येत्या 5 जुलैला म्हणजेच मंगळवारी दिल्लीतील ईडी कार्यालयात दाखल राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. मुंबईमध्ये ईडीचे कार्यालय असताना राजधानी दिल्लीतील कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलाविण्यामागे काय उद्देश असू शकतो यावर चर्चा होऊ लागली आहे.

संजय पांडे यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रकरणी समन्स बजावला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चांगले संबंध होते. त्यामुळे संजय पांडे यांना बजावण्यात आलेल्या समन्सने राज्याच्या राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येण्याची दाट शक्यता आहे. राज्यात या आठवड्यातच सत्ताबदल झाला आहे. आणि तीन नुकतेच 30 जून रोजी संजय पांडे हे मुंबई पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले आहेत. निवृत्त होताच त्यांना चौकशीसाठी फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे. राजकीय हेतुने प्रेरित होऊन संजय पांडे यांच्यावर ही नोटीस जारी करण्यात आल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे.

कोणत्या प्रकरणात बजावली नोटीस - एनएसई सहस्थान घोटाळ्यात 2018 मध्ये सीबीआयने खटला दाखल केला होता. सीबीआयच्या या खटल्याच्या आधारे ईडीकडून तपास केला जात आहे. गेल्या आठवड्यात मुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालेल्या संजय पांडे यांनी एनएसई 2001 मध्ये समाविष्ट केलेल्या ऑडिट कंपनीने लाल झेंडा कसा लावला नाही याचा तपास करत आहे. NSE सर्व्हरशी छेडछाड झाली. त्यामुळे व्यापार कंपन्यांपैकी एकाला सिस्टीममध्ये अयोग्य प्रवेश मिळू शकला. परिणामी नफा कमी झाला. हा सगळा प्रकार संशयास्पद असल्याने ईडीने याचा आता तपास सुरू केला आहे. तथापि, तपासासाठी ईडीने निवडलेला हा काळ पाहता त्यावर विरोधकांकडून आरोप होऊ शकतात.

हेही वाचा - अमित शहा यांच्यासह योगी अन् आसामचे मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; पहा काय आहे माहिती

Last Updated : Jul 3, 2022, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.