मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मोठी कारवाई केली आहे. प्रफुल पटेल यांचे सीजे हाऊस मधील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय इक्बाल मिर्ची प्रकरणात ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत ( Ed Seized Properties NCP Leader Praful Patel ) आहे.
'या' कारणामुळे घर केलं जप्त - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय म्हणून प्रफुल्ल पटेल यांची ओळख आहे. ईडीला त्यांच्या मालमत्तेविषयी अनियमितता आढळली होती. त्याचमुळे प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील सीजी हाऊसमधील घरावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण? - हवाई क्षेत्रातील एव्हीएशन डिलमध्ये दीपक सलवारचा सहभाग असल्याचं समोर आलं होतं. संशयित व्यवहारासंदर्भात प्रफुल्ल पटेल यांना 6 जूनला सुद्धा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेले आर्थिक व्यवहार समोर आले होते.
वरळी येथील सीजे हाऊस ही एक मोठी इमारत आहे. याच इमारतीच्या बांधकामाआधी तिथे एक छोटीसी इमारत होती. ती इमारत गँगस्टार इक्बाल मिर्ची याच्या ताब्यात होती. ती इमारत प्रफुल्ल पटेल यांच्या कंपनीने पुनर्विकासित केल्याची माहिती समोर आलेली. त्या इमारतीच्या जागेच्या मोबदल्यात पटेल यांच्या कंपनीकडून इक्बाल मिर्ची आणि त्याच्या नातेवाईकांना जागा आणि पैसे दिल्याची माहिती समोर आली. याच प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यापूर्वी दोनवेळा प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता सीजे हाऊसमधील घरावर ईडीने जप्ती आणली आहे.
हेही वाचा - CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; यंदा गणेशोत्सव, दहीहंडी धुमधडाक्यात