ETV Bharat / city

राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; पॉर्नोग्राफीनंतर मनी लाँड्रिंग प्रकरणी केस दाखल - raj kundra case in money laundering case

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राविरोधात पीएमएलए केस दाखल केली आहे. अश्लील चित्रफितीची विक्री करून त्याद्वारे मिळवलेला पैसा कुंद्रा यांनी लंडनमधील एका Llyod बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

raj kundra
राज कुंद्रा
author img

By

Published : Sep 18, 2021, 7:38 PM IST

Updated : Sep 18, 2021, 10:14 PM IST

मुंबई - फिल्म इंडस्ट्रीमधील नवोदित कलाकारांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत अश्लील चित्रफिती बनवल्या जात होत्या. या पॉर्नोग्राफी प्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्राच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे. त्यानंतर आता मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने राज कुंद्राविरोधात पीएमएलए केस दाखल केली आहे. अश्लील चित्रफितीची विक्री करून त्याद्वारे मिळवलेला पैसा कुंद्रा यांनी लंडनमधील एका Llyod बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज कुंद्राच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

हेही वाचा - पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग म्हणाले,...

  • अश्लील चित्रफितीच्या माध्यमातून पैसे कमवले -

राज कुंद्रा अंधेरी येथील विआन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या त्यांच्या स्वतःच्या कार्यालयातून हॉटशॉट्स अॅप चालवत असे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास इच्छुक तरुणींना ब्रेक देण्याच्या बहाण्याने राज कुंद्रा यांनी अश्लील चित्रफिती बनवून त्या प्रसारित केल्या. या प्रकरणी राज कुंद्रा व रायन थॉर्प यांना अटक केली असून, त्यांची नावे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार्जशीटमध्ये नोंदवली आहेत. नवोदित कलाकारांच्या आर्थिक समस्यांचा फायदा घेत आरोपींनी अश्लील चित्रफितीसाठी नग्न चित्रीकरणाचे आमिष दाखवले. त्यानंतर विविध वेबसाइट्सवर तसेच मोबाईल अॅप्लिकेशनवर अश्लील चित्रफिती अपलोड केल्या. यातून आरोपींनी पैसे कमावले असे चार्जशीटमध्ये नमूद केले आहे.

  • जामीन अर्ज मागे घेतला -

राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांना मुंबई गुन्हे शाखेने १ जुलै रोजी अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची जामीन याचिका मुंबई सत्र न्यायालयापुढे प्रलंबित होती. आज त्यावर सुनावणी होणार होती. मात्र, कालच मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पुरवणी चार्जशीट दाखल केले आहे. त्यात राज कुंद्रा यांचे नाव असल्याने त्यांनी आता याच न्यायालयात जामीन मिळावा यासाठी आपला जामीन अर्ज मागे घेतला आहे.

हेही वाचा - ....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी

Last Updated : Sep 18, 2021, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.