मुंबई - नवाब मलिक प्रकरणात ईडीने कुर्ला परिसरात येथील गोवावाला कंपाऊंडमध्ये छापेमारी केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसह CRPF'ची टीम दाखल झाली आहे. येथे पाच ते सहा अधिकाऱ्यांची टीम तपास करत आहे. (ED Raids Kurla Goa compound Area) यामध्ये महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्या, गोवावाला परिसरातील नागरिकांसोबत ईडीची टीम चर्चा करत आहे.
नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत
राज्याचे अल्पसंख्यांक व विकास मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने मागील महिन्यात अटक केली होती. काल (दि. 21 मार्च)रोजी पुन्हा न्यायालयाने नवाब मलिक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. आज (दि. 22 मार्च)रोजी पुन्हा नवाब मलिक यांच्या विरोधात सक्रिय झाले असून ईडीले गोवावाला कंपाउंडमध्ये छापेमारी सुरू केली आहे. याच जमीनी संदर्भात नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे पुन्हा नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
कागदपत्र तिथे आढळून येतात का त्याची चौकशी केली
कुर्ल्यातील गोवावाला कंपाउंड तीन एकरावरील जमीन आहे. याच संदर्भात ईडीकडून ही कारवाई केली जात आहे. जागेची पाहणी केली जात आहे. कागदपत्र तिथे आढळून येतात का त्याची चौकशी केली जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. मुंबईच नाही तर ठाण्यातही ही मोठी कारवाई झाल्याची माहिती आहे.
सीआरपीएफची टीम गोवावाला कंपाऊंड येथे दाखल
नवाब मलिक प्रकरणांमध्ये आज ईडीला एका व्यक्तीने आणखी काही तक्रार दिली असल्याची माहिती प्राप्त होत आहे ईडी ने आज कुर्ल्यात टाकलेल्या छापेमारी दरम्यान सदर तक्रारदार हा पहिले ईडी कार्यालयात आला होता त्यानंतर ईडी अधिकाऱ्यांसह सीआरपीएफची टीम या तक्रारदार सोबत कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड येथे दाखल झाली आहे. त्यानंतर संबंधित तक्रारदार आणि अधिकाऱ्यांनी येथील चौकशी सुरू केली आहे. नवाब मलिक यांचे त्या परिसरात आणखी काही अनधिकृत जागा असल्याची माहिती ईडीला मिळाले आहे. त्या अनुषंगाने ईडीचे अधिकारी तपास करत आहेत.
नवाब मलिक यांच्यावर काय आहे आरोप?
नवाब मलीक यांना झालेली अटक अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या कुटुंबाकडून जमीन खरेदीशी संबंधित आहे. या प्रकरणात तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा आरोप केला आहे. या प्रकरणी ईडीने 23 फेब्रुवारी रोजी नवाब मलिक यांना अटक केली होती. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार दंडनीय गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप तपास संस्थेने केला होता. त्याच्या अटकेनंतर ईडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये
7 मार्च रोजी त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी रुपये असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
हेही वाचा - Sanjay Raut Attack on Central Govt : 'महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही'