ETV Bharat / city

Maharashtra Heavy Rains Impact : मुसळधारचा फटका ! राज्यात आत्तापर्यंत पावसामुळे 84 जणांचा मृत्यू

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 84 जणांना ( 84 person Kill Due to Heavy rain in Maharashtra ) आपला प्राण गमवावा लागला आहे तर 180 जनावरांचे बळी गेले आहेत, अशी माहिती सरकारने दिली आहे. राज्यात पाऊस अजूनही सुरू असल्याने एनडीआरएफच्या पथकाद्वारे नियंत्रणाचे काम सुरू असल्याचेही सरकारने सांगितले.

मुसळधारचा फटका
मुसळधारचा फटका
author img

By

Published : Jul 12, 2022, 4:10 PM IST

मुंबई - मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यामध्येही अतिवृष्टी झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीत आतापर्यंत राज्यात पावसाचे सुमारे 84 बळी ( 84 person Kill Due to Heavy rain in Maharashtra ) गेले आहेत. तर 180 जनावरांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. कोकण विभागात मुंबई उपनगरात एका व्यक्तीला तर ठाणे जिल्ह्यात पाच जणांना जीव गमवावा लागला आहे. त्या पाठोपाठ पालघरमध्ये चार जणांचा पावसात बळी गेला आहे. तर कोकणात 46 जनावरांचा बळी गेला आहे.

मुसळधारचा फटका : पुणे आणि सातारा जिल्ह्यात पावसामुळे प्रत्येकी एका व्यक्तीला जीव गमवावा लागला असला तरी पुणे जिल्ह्यात वीस जनावरे दगावली आहेत. नाशिक विभागात नाशिकमधील सर्वाधिक बारा लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर 17 जनावरे दगावली आहेत. औरंगाबाद विभागामध्ये जालना जिल्ह्यात आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी तिघांना जीव गमवावा लागला आहे. बीडमध्ये सर्वाधिक आठ जनावरे वाहून गेली आहेत. अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर बारा जनावर दगावली आहेत. त्या पाठोपाठ वाशिम जिल्ह्यात सतरा जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यात चार जणांना जीव गमवावा लागला आहे. वीस जनावरे दगावली असून नागपूरमध्ये सर्वाधिक नऊ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. एकूण आतापर्यंत 84 नागरिकांना आणि 180 जनावरांना प्राणास मुकावे लागले आहे.

एनडीआरएफ आणि एचडीआरएफची पथके तैनात : राज्यात सर्वत्र अतिवृष्टी सुरू असल्याने पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या पूर प्रवण जिल्ह्यांमध्ये या आधीच तैनात केल्या आहेत. मुंबई जिल्ह्यात कांजूरमार्ग आणि घाटकोपर येथे प्रत्येकी एक एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. रायगड महाड येथे दोन एनडीआरएफ ची पथके तर ठाणे रत्नागिरी आणि कोल्हापूर येथे प्रत्येकी दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. सातारा सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले असून राज्यात आता एनडीआरएफची तेरा पथके तैनात आहेत. तर नांदेड जिल्ह्यात आणि नाशिक जिल्ह्यात एसडीआरएफची प्रत्येकी एक पथक तैनात असून गडचिरोली जिल्ह्यात दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. तर मुंबई बेस्ट स्टेशनला इंडियाची तीन पथके तयार असून पुणे आणि नागपूर बेसला प्रत्येकी एक पथक तयार ठेवण्यात आल आहे.

मालमत्तेचे नुकसान : आतापर्यंत अतिवृष्टीमुळे राज्यातील 29 गावे बाधित झाली आहेत. तर आतापर्यंत राज्यात 387 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टीमुळे 66 जणांची जखमी म्हणून नोंद झाली असून राज्यातील 44 घरांचे पूर्णतः नुकसान झाले असून 1368 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. सुमारे सहा हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून 35 ठिकाणी निवारा केंद्र उभे करण्यात आले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 29 मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद झाली आहे. मुंबईतील सांताक्रुज येथे 62 मिलिमीटर पावसाची तर कुलाबा येथे 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत गुलाब्यात १०५९ मिलिमीटर तर सांताक्रुज येथे ११७७ मिलिमीटर पावसाची एकूण नोंद झाली आहे.

हेही वाचा - Video : गोदावरी नदीला पूर; काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली, पूर बघण्यासाठी नागरिकांची गर्दी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.