मुंबई - बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडामुळे ( Eknath Shindes revolt ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आता शिवसेना फक्त अस्तित्वासाठी उरली आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी केवळ ९ जिल्ह्यांमधले आमदार आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात राहिले आहेत. शिवसेनेकडे असलेल्या ५५ आमदारांपैकी ३९ आमदार शिवसनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath Shindes ) गटाकडे गेल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्या शिवसेनेकडे फक्त १६ आमदार उरले ( Shiv Sena has only 16 MLA ) आहेत. पाहूया कुठल्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे?
कुणी स्वप्नातही विचार केला नसेल अशी परिस्थिती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची झाली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून गट स्थापन केल्यामुळे महाविकास आघाडी सरकारमधील ( Mahavikas Aghadi government ) शिवसेनेचे ३९ आमदार फुटले आहेत. सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे एकूण १६ आमदार आहेत. त्यात मुंबईचे ८ कोकणातील ३ मराठवाड्यातील ४ आणि विदर्भातील १ या आमदारांचा समावेश आहे.
मुंबई, मुंबई उपनगर - उद्धव ठाकरे यांचे मुंबई व मुंबई उपनगरात ( Mumbai, Mumbai-Suburbs ) १३ आमदार होते. त्यापैकी आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी), संजय पोतनीस (कलीना), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील प्रभू (दिंडोशी), रवींद्र वायकर (जोगेश्वरी, पूर्व), सुनील राऊत (विक्रोली), रमेश कोरगावकर (भांडुप, पश्चिम) हे ८ आमदार ठाकरे सेनेबरोबर राहिले आहेत. सदा सरवणकर (महिम), मंगेश कुडाळकर (कुर्ला), दिलीप लांडे (चांदिवली), प्रकाश सुर्वे (मागाठणे), यामिनी जाधव (भायखळा), हे ५ आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत.
कोकण - कोकणात (Konkan) उद्धव ठाकरे यांचे १० आमदार होते. त्यातील भास्कर जाधव (गुहागर), राजन साळवी (राजापूर), वैभव नाईक (कुडाळ) हे ३ आमदार ठाकरे सेनेबरोबर राहिले असून उदय सामंत (रत्नागिरी), दीपक केसरकर (सावंतवाडी), योगेश कदम (दापोली), महेंद्र दळवी (अलिबाग), महिंद्र थोरवे (कर्जत खालापूर), भरत गोगावले (महाड), श्रीनिवास वनगा (पालघर), हे ७ आमदार एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत.
मराठवाडा - उद्धव ठाकरे यांचे मराठवाड्यात ( Marathwada ) १२ आमदार होते. त्यापैकी संतोष बांगर (कळमनुरी), राहुल पाटील (परभणी), उदय सिंग राजपूत (कन्नड), कैलास घाडगे पाटील (उस्मानाबाद), हे ४ आमदार ठाकरे सेनेबरोबर राहिले असून प्रदीप जयस्वाल (औरंगाबाद,मध्य), धनराज चौगुले (उमरगा), बालाजी कल्याणकर (नांदेड' उत्तर), संजय शिरसाट (औरंगाबाद, पश्चिम), तानाजी सावंत (परंडा), अब्दुल सत्तार (सिल्लोड), संदिपान भुमरे (पैठण), रमेश बोरणारे (वैजापूर), हे ८ आमदार शिंदे गटासोबत गेले आहेत.
विदर्भ - विदर्भात ( Vidarbha) उद्धव ठाकरे सरकारचे ४ आमदार होते. त्यापैकी नितीन देशमुख (बाळापूर), हे एकमेव आमदार ठाकरे सरकारबरोबर राहिले आहेत. संजय राठोड (दिग्रस), डॉक्टर संजय रायमुलकर (मेहकर), संजय गायकवाड (बुलढाणा), हे एकनाथ शिंदे गटासोबत गेले आहेत.
पश्चिम महाराष्ट्र - पश्चिम महाराष्ट्रात ( Western Maharashtra ) उद्धव ठाकरे सेनेचे पाच आमदार होते. शंभूराजे देसाई (पाटण), प्रकाश आबिटकर (राधानगरी), अनिल बाबर (खानापूर), महेश शिंदे (कोरेगाव), शहाजीबापू पाटील (सांगोला), व हे सर्व आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे शिवसेना शून्यावर आली आहे.
उत्तर महाराष्ट्र - उत्तर महाराष्ट्र ( North Maharashtra ) तही उद्धव ठाकरे सेनेचे सहा आमदार होते. दादा भुसे (मालेगाव बाह्य), सुहास कांदे (नांदगाव), गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), लताबाई सोनवणे (चोपडा), किशोर पाटील (पाचोरा), चिमणराव पाटील (एरंडोल), व हे सर्व सहा आमदार एकनाथ गटात सामील झाल्याने आता उत्तर महाराष्ट्रातही ठाकरे शिवसेना शून्यावर आली आहे.
ठाणे - ठाण्यात उद्धव ठाकरे सेनेचे पाच आमदार होते. एकनाथ शिंदे (कोपरी-पाचपाखाडी), प्रताप सरनाईक (ओवळा- माजिवाडा), शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), बालाजी किणेकर (अंबरनाथ), विश्वनाथ भोईर (कल्याण पश्चिम).ज्यांनी बंडखोरी केली आहे ते ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पाचही आमदार आपल्या गटात समाविष्ट केल्याने ठाण्यामध्ये ठाकरे शिवसेना शून्यावर आली आहे.
अशाप्रकारे ५५ आमदारांची संख्या असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आता फक्त १६ आमदार उरले असून ३९ आमदार एकनाथ शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत. अशाप्रकारे आता राज्यातील २५ टक्के जिल्ह्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचे आमदार असून, ५० टक्के जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे समर्थक आमदार आहेत.
हेही वाचा - ED second summon to Sanjay Raut : संजय राऊत यांना ईडीची पुन्हा नोटीस, एक जुलैला चौकशीसाठी बोलावले