ETV Bharat / city

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti : संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव - नाना पटोले

author img

By

Published : Apr 14, 2022, 4:54 PM IST

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिला आहे. सर्व समाजाचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्याचे काम संविधानाच्या ( Constitution ) माध्यमातून होत आलेले आहे. देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरांनी दिलेले संविधान ( Constitution ) वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन नाना पटोले यांनी महामानवास अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

नाना
नाना

मुंबई - माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिला आहे. सर्व समाजाचे न्याय व हक्क अबाधित ठेवण्याचे काम संविधानाच्या ( Constitution ) माध्यमातून होत आलेले आहे. देशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार संविधानिक संस्था संपवून संविधानच संपुष्टात आणण्याचे काम करत आहेत. या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आंबेडकरांनी दिलेले संविधान ( Constitution ) वाचवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त ( Dr. Babasaheb Ambedkar Jayanti ) दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन नाना पटोले यांनी महामानवास अभिवादन केले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

संविधान धोक्यात - नाना पटोले म्हणाले, जाती धर्मात विष पेरून काही पक्ष व संघटना सामाजिक वातावरण दुषित करण्याचे काम करत आहेत. देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. पण, काही लोक संविधानाला धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत. देशाला मिळालेले स्वातंत्र्य व संविधान आज धोक्यात असून ते वाचवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथेही नाना पटोले यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत काँग्रेस प्रदेशाध्यांनी आजचा दिवस देशभर एक उत्सव म्हणून साजरा करा, असे आवाहन केले.

हेही वाचा - Rajgruha Mumbai : बाबासाहेबांच्या लाखो अनुयायींचा श्रद्धास्थान असलेला 'राजगृह'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.