मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट असली ( Covid Third Wave In Maharashtra ) तरी, दुसऱ्या लाटेतील डेल्टा विषाणूचे प्रमाण अधिक आहे. वयोवृद्ध व इतर व्याधी असलेल्या रुग्णांमध्ये डेल्टाचा संसर्ग झाल्याने मृत्यूचा आकडा वाढल्याची ( Deaths Increased Due To Delta ) माहिती आयएमएचे अधिष्ठाता डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये डेल्टाचे प्रमाण आठ टक्के असून, ते कमी न झाल्यास मृत्युदर वाढेल, असेही म्हणाले.
- मृत्यूंचे प्रमाण वाढले
राज्यात कोरोनाची तिसरी लाट पसरली आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉनचा संसर्गही फैलावत ( Omicron In Maharashtra ) आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले ( Covid Restrictions In Maharashtra ) आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत चढ-उतार दिसून येत आहेत. मागील दोन दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत घट झाली आहे. मात्र, मृत्यू होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. शुक्रवारी एकाच दिवशी 103 रुग्णांचा मृत्यू ( Covid Deaths In Maharashtra ) झाल्याची आकडेवारी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये सक्रिय रुग्णांचे ( Active Covid Patients Maharashtra ) प्रमाणही 1 लाख 66 हजार इतके आहे. समाधानकारक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचा 94.61 टक्के इतका असून, आतापर्यंत 72 लाख 42 हजार 649 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
- मृत्यूदर वाढू शकतो!
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची साथ कमी होत नाही. शहरी भागात ही लाट स्थिर आहे. तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढताना दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेतील डेल्टा विषाणू आजही रुग्णांमध्ये आहे. तर ओमायक्रॉनचे प्रमाण 89 टक्के तर तर डेल्टा आठ टक्के आहे. आजही अनेकांना डेल्टाचा संसर्ग होतो आहे. डेल्टाचा संसर्ग झाला आणि त्या रुग्णाला इतर व्याधी असतील किंवा वयोमान अधिक असेल तर गंभीर त्रास होतात. रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करावे लागते. चार दिवसांपूर्वी राज्य सरकारने दिलेल्या कोरोनाच्या आकडेवारीत रुग्णालयात उपचार घेत असलेले सर्व रुग्ण डेल्टा विषाणू बाधित आहेत. जिनोम स्क्विन्सिंग चाचणीतून ( Genome Sequencing Test ) समोर आल्याची माहिती डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली. वातावरणातून डेल्टा विषाणू आजही नष्ट झालेला नाही. त्यामुळे रुग्णांना डेल्टाची बाधा झाल्यास आणि त्याला इतर व्याधी असल्यास मृत्यूचा आकडा वाढू शकतो, असेही डॉ. भोंडवे म्हणाले.
- शाळा सुरु करण्यावर म्हणाले...
राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला ( Schools Reopened Maharashtra ) आहे. ज्यामध्ये पहिली ते बारावीची शाळा २४ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा निर्णय लहान मुलांच्या बाबतीत किती योग्य आहे? याबाबत ईटीव्ही भारतने टास्क फोर्सचे डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचं मत व्यक्त केलं ( Dr Avinash Bhondwe Warned State Government ) आहे.
- नववीपर्यंतच्या मुलांचं लसीकरण नाही
सध्या फक्त १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू ( Children Vaccination Maharashtra ) आहे. मात्र, पहिली ते नववीपर्यंतच्या मुलांना कोणत्याही प्रकारचे लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे अशावेळी शाळा सुरू करणं हे कितपत योग्य आहे, याचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा, असे मत डॉक्टर भोंडवे यांनी मांडले. तसेच मुलांना शाळेत पाठवणे हे धाडसाचं आणि मुलांच्या स्वास्थ्याच्यादृष्टीने धोक्याचे ठरेल, असे ते म्हणाले. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारने कोव्हॅक्सिन कंपनीला २ ते १८ वयोगटासाठी आणि झायकोव्ह डी या कंपनीला ५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस तयार करण्याची परवानगी दिली ( Covid Preventive Vaccine For Children ) होती. त्यामुळे जर लहान मुलांच्या लसीकरणासाठी जर ऑक्टोबरपासून प्रयत्न केले गेले असते तर सर्व शालेय मुलांचे लसीकरण झाले असते. मात्र, त्यानुसार कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. तसेच मार्च महिन्यामध्ये साधारण १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मुलांचे लसीकरण ना करताच शाळा सुरू करून मुलांचं स्वास्थ्य धोक्यात का घातलं जातंय? याचा विचार करणे गरजेचे आहे. जर मार्चमध्ये मुलांचे व्हॅक्सिनेशन होणार असेल तर २४ जानेवारीला शाळा सुरू करून काहीच साध्य होणार नाही.
- 'ही' मुलं बाधित होण्याची शक्यता
तसेच कोणतेही पालक आपल्या मुलांचं लसीकरण झाल्याशिवाय शाळेत पाठवण्यास नाही. जरी राज्य सरकार आणि शहराचे पालक अधिकारी असे निर्णय घेत असले तरी पुणे-मुंबई शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे आकडे चढ- उतार करत आहेत. संपूर्ण पुणे शहराचा आकडा जर आपण विचारात घेतला तर ४० हजार पेक्षा जास्त रुग्ण पुणे-मुंबईसारख्या शहरांमध्ये सापडतील. केवळ शहरी भागात नाही तर ग्रामीण भागात देखील लहान मोठ्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला ( Covid Spread In Maharashtra ) आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवणं, हे त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने धोक्याच आहे. जरी बाल रोग तज्ज्ञांच्या मते लहान मुलांना कोरोनाचा धोका हा कमी असला तरी काही लहान मुलांमध्ये जन्मजात काही आजार असतात. त्यामध्ये मधुमेह, हृदयविकार, स्थूलता अशा प्रकारचे अनेक रोग लहान मुलांना असतात. अशावेळी ही मुलं बाधित होऊ शकतात, असेही डॉक्टर भोंडवे म्हणाले.