ETV Bharat / city

रेमडेसिवीरचा गेमडेसिवीर करू नका -रामदास आठवलेंची ठेवणीतल्या शब्दांत टीका

author img

By

Published : Apr 19, 2021, 1:06 PM IST

Updated : Apr 19, 2021, 3:20 PM IST

महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही. रेमडेसिवीर चा गेमडेसिवीर करू नका अशी टीका आठवलेंनी राज्य सरकारवर केली आहे.

'रेमडेसिवीरचा गेमडेसिवीर करू नका'
'रेमडेसिवीरचा गेमडेसिवीर करू नका'

मुंबई : रेमडेसिवीरच्या मुद्द्यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे. रेमडेसिवीरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे आदेश कोणतेही सरकार देऊ शकत नाही. राज्य सरकार केंद्रावर खोटे आणि खोडसाळ आरोप करीत आहे. महाविकास आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपवू शकत नाही. रेमडेसिवीर चा गेमडेसिवीर करू नका अशी टीका आठवलेंनी राज्य सरकारवर केली आहे.

केंद्रावर खोडसाळ आरोप करू नये

कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीही आहे. त्यामुळे या परिस्थितीत आरोपांचे राजकारण कुणी करू नये. कोरोनाच्या महामारीमुळे मोठया प्रमाणात मृत्यू होत आहेत. त्यास पंतप्रधान मोदी जबाबदार असल्याचा खोटा खोडसाळ आरोप राज्य सरकार करीत आहे. देशात कोरोनाचा कहर रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करीत आहेत. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, राज्यपालांशी संवाद साधत आहेत. महराष्ट्राच्या महाविकास आघाडीने दुतोंडी भूमिका घेऊ नये. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस आणि ऑक्सिजन, तसेच रेमडेसिवीरसह सर्व औषधांचा पुरवठा करत आहे. राज्य सरकारने कोरोना च्या मुद्द्यावर राजकारण करू नये आणि खोटे खोडसाळ आरोप केंद्र सरकारवर करू नये असे आठवलेंनी म्हटले आहे.

राज्य सरकार अपयश लपवत आहे
मला रोज मुंबईसह राज्यातून फोन येत आहेत की, रुग्णांना बेड मिळत नाही. रुग्णांची गैरसोय होत आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना सुविधा पुरविण्यात मुंबई मनपा आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवून आपले अपयश लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे असा आरोप आठवलेंनी आज मुंबईत केला.

Last Updated : Apr 19, 2021, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.