ETV Bharat / city

2024 नंतर भूमिगत होऊ नका, संजय राऊतांचा भाजपला इशारा - Don't go underground after 2024, Sanjay Raut warns BJP

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवाब मलिक यांची बाजू घेत विरोधकांना इशारा दिला आहे. 2024 नंतर भेटू. तुमच्याही फायली तयार आहेत. तेव्हा भूमिगत होऊ नका, बाथरूममध्ये लपू नका असा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

2024 नंतर भूमिगत होऊ नका, संजय राऊतांचा भाजपला इशारा

author img

By

Published : Nov 2, 2021, 1:24 PM IST

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवाब मलिक यांची बाजू घेत विरोधकांना इशारा दिला आहे. 2024 नंतर भेटू. तुमच्याही फायली तयार आहेत. तेव्हा भूमिगत होऊ नका, बाथरूममध्ये लपू नका असा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.

कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. 2024 नंतर भेटू. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे, असा इशारा राऊत यांनी दिला.

अटक दुर्दैवी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झालेली अटक दुर्दैवी आहे. कायद्याला धरून नाही. नितीमत्तेला धरून नाही. आरोप करणारे पळून जातात आणि पहिल्याच भेटीत तपास न करता अटक केली जाते. हे ठरवून केलं जातं आहे असेही राऊत म्हणाले.

घाणेरडं राजकारण सुरू
भाजप नेत्यांच्या संपत्तीविषयी माहिती तपास यंत्रणांना दिली आहे. पण अजून काहीच केलं नाही. हे घाणेरडं राजकारण करत आज उड्या मारात आहेत. उद्या ते तोंड लपवून पळून जातील. दिवाळी नंतर हे बाथरूम मध्ये तोंड लपवून बसतील. आम्ही संयम पाळून आहोत असेही राऊत म्हणाले. मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देण्यात आला. भाजप नेत्यांच्या दबावाला बळी पडत त्यांनी असं केलं असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हे लोक क्रूर आहेत. अनिल देशमुख अनेक दिवस गायब नव्हते न्यायालयीन लढाई लढत होते. आरोप करणारे पळून गेले, त्यांना आणा असेही राऊत म्हणाले.

केंद्राच्या मदतीनेच सिंगांचे पलायन

लूक आउट नोटीस, रेड कॉर्नर नोटीस देऊन परमबीर सिंग विदेशात पळून गेले असतील त्याला केंद्र सरकार जबाबदार आहेत. केंद्र सरकारच्या सहकार्याशिवाय ते देशाबाहेर जाऊ शकत नाही असा आरोपही राऊत यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

सुमोटो कारवाई करावी
नवाब मलिकांनी यांनी सकाळी पत्रकार परिषदेत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर बोलताना राऊत यांनी सांगितले की केलेल्या आरोपावरून इन्कम टॅक्सने याची सुमोटो दखल घेत कारवाई केली पाहिजे.

शिवसेनेचा विजय निश्चित
दादरा, नगर हवेली या ठिकाणी शिवसेना उमेदवार आघाडीवर आहे. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला उमेदवार निवडून येणार असा विश्वास ही राऊत यांनी व्यक्त केला.

आम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत पोहचायचं का?
काही लोकं म्हणतात दिवाळीनंतर आम्ही असं करू, तसं करू. यांना घरातून नाही, हे स्वतःची तोंडं बाथरूममध्ये लपवून बसतील असे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात. पण हे करायचं का, आम्ही तुमच्या कुटुंबापर्यंत पोहचायचं का? असंही राऊत म्हणाले. बाळासाहेब ठाकरे असो की उद्धव ठाकरे असो की शरद पवार असो, आम्हाला आमच्या नेत्यांनी राजकारणात हे शिकवलं नाही. ही पातळी ओलांडायची नाही, संयम महत्त्वाचा, संस्कार आणि संस्कृती पाळायची. केंद्रीय संस्था आज जे करत आहेत ते राजकीय षडयंत्र आहे असेही राऊत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.